निर्विघ्न दर्शनासाठी भीमाशंकरमध्ये योग्य व्यवस्था
भीमाशंकर, ता. २२ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २५ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. पहिला श्रावणी सोमवार २८ जुलैला असून शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दोन दिवस आधीपासूनच भाविकांची भीमाशंकर मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासनाकडून भाविकांना सुलभपणे दर्शन होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्तर भारतीयांचा श्रावणी सोमवार (ता. १४) जुलैपासून सुरू झाल्यामुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यावर्षी २८ जुलै तसेच ४, ११ आणि १८ ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे. त्याआधी शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे दर्शनसाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. व्हीआयपी दर्शनासाठी दर्शनरांगा १० ते १५ मिनिटे थांबविली जाते. त्यामुळे तासनतास दर्शनबारीत उभे असलेल्या भाविकांना दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ‘व्हीआयपी’ दर्शन बंद ठेवावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून भीमा शंकरसाठी शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरुनगरसह १२ आगारांतून शनिवार आणि रविवारी एकूण ४६ जादा बसेसचे नियोजन केले आहे. भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी सर्व विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. वाहनतळ ते मंदिर वाहतुकीसाठी मिनी बसची व्यवस्था असणार आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील पार्किंग नंबर एक ते बसस्थानक या ठिकाणी दुतर्फा लागणाऱ्या वाहनांमुळे अडचण होते. परिणामी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हा परिसर ‘नो पार्किंग’ म्हणून घोषित करण्यात यावा.
- सागर पवार, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव, ता. आंबेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.