राजपूर आश्रमशाळेत सांस्कृतिक उपक्रम
भीमाशंकर, ता. १० ः राजपूर (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला, अशी माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण देवकर यांनी दिली.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषवाक्यांचा गजर करत, आदिवासी संस्कृती, एकता व शिक्षणाचे महत्त्व जनजागृतीद्वारे प्रभात फेरीने व्यक्त केले. प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, विठ्ठल-रुक्मिणी, राधा-कृष्ण, इतर आदिवासी वीरांचे आविष्कार साकारले. त्याचप्रमाणे चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धा, आदिवासी नृत्य, गाणे, सांस्कृतिक, प्रश्नमंजूषा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले.
यावेळी सरपंच चंद्रकांत लोहकरे, उपसरपंच गोरक्षनाथ वायाळ, निवृत्ती गवारी, का. बा. लोहकरे, श्रावण हिले, प्रकाश लोहकरे, उत्तम वाघमारे, सतीश भोते, निवृत्ती गवारी, अरुण उंडे, हनुमंत वडेकर, जिजाराम भोईर, श्रीकांत लोहकरे, महेश भोते, दूंदा जढर, मंदा कुराडे, वैशाली तिटकारे, सीताराम लोहकरे, बुधाजी लोहकरे, ग्रामसेवक साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. मोहन वाघमारे यांनी आभार मानले.