दरड कोसळल्याने जांभोरीकर भयभीत

दरड कोसळल्याने जांभोरीकर भयभीत

Published on

फुलवडे, ता. ३० : जांभोरी (ता. आंबेगाव) येथील काळवाडी नं. १ येथे मुसळधार पावसामुळे रविवारी (ता. २८) दगड कोसळली. दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जांभोरी गावठाण येथील जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनच्या सभागृहात हलविण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची व इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
दरड कोसळल्याचे कळताच सोमवारी (ता. २९) माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला. “शासनाने जमीन खरेदी केली आहे. घर बांधण्यासाठी शासनाकडून एक लाख ६० हजार रुपये मिळणार असून, उर्वरित निधी सीएसआरच्या माध्यमातून उभा करून काळवाडी क्रमांक १ व २ या वस्त्या मिळून ७० घरे काही महिन्यांत पूर्ण केली जातील. ग्रामस्थांना चांगली स्लॅबची, टिकाऊ घरे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन वळसे पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.
यावेळी पूर्वा वळसे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सरपंच सुनंदा पारधी, संजय गवारी, प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावले, प्रवीण पारधी, अमोल अंकुश, श्यामराव बांबळे, पोलिस पाटील सोनाली पोटे, नवनाथ केंगले, सुनील पारधी, विशाल गारे, उपसरपंच बबन केंगले, किसन पारधी, विठ्ठल पारधी, दुंदा भोकटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

04481

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com