डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात हंसांचे दर्शन

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात हंसांचे दर्शन

Published on

फुलवडे, ता. १६ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात हंसांच्या आगमनाने धरण पाणलोट क्षेत्राच्या सौंदर्यात भर पडली आहे. ही एक आनंददायी आणि निसर्गरम्य गोष्ट असून, जलाशयांचे किनारे पाण्यापासून मुक्त झालेल्या हिरवळीवर हे पक्षी चरत असतानाचे दर्शन मनोहारी वाटते.
पक्ष्यांचे आगमन हे परिसरातील पर्यावरणाच्या चांगल्या स्थितीचे प्रतीक मानले जाते. धरण पाणलोट क्षेत्रात त्यांना पुरेसे अन्न आणि सुरक्षित निवारा मिळतो, ज्यामुळे ते तिथे आकर्षित होतात, असे निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षक अरविंद मोहरे यांनी सांगितले.
या पक्ष्यांचा डोक्यावर दोन्ही बाजूला दोन गडद काळपट पट्टे असतात. पांढरेशुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्टे या ऐटबाज हंसाना ओळखण्याच्या खुणा आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेल्या या हंसांची चोच गुलाबी किंवा काळसर असते. पाय नारंगी, पिवळे असतात. राखी रंगाच्या पंखावर काळे पट्टे असतात. शेपटीचे मूळ आणि टोक शुभ्र असते.
पहाटेच्या वेळी हे हंस आवाज करत एकमेकांना साद घालत असतात. हा आवाज कर्णमधुर वाटतो. हे पक्षी नेहमी समूहाने खाद्यान्न शोधत असतात. खाद्यावर ताव मारताना काही कारणाने एकदम थव्याने उड्डाण घेतल्यावर सूर्यप्रकाशात त्यांच्या पंखाखालील कातडीची चमक पक्षी निरीक्षकांना मोहित करतात.

हंसाची शिकार होण्याची शक्यता
हे हंस पक्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बहुसंख्येने वावरताना दिसून येत होते. मात्र, जलाशय परिसरात मानवी वावर वाढल्यामुळे पक्ष्यांची संख्या रोडावत चालली आहे. दुपारच्या वेळी हे पक्षी जलाशयाच्या काठावर आडोशाला विश्रांती घेत असतात. अशा बेसावध वेळी या पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता असते. या हंसांच्या भयमुक्त वातावरणात वावरण्यासाठी धरण परिसरात पोषक वातावरण निर्माण करून द्यायला पाहिजे, असे मोहरे यांनी सांगितले.

04545

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com