तळेघरमधील निवासस्थान मोडकळीस
अविनाश घोलप : सकाळ वृत्तसेवा
फुलवडे, ता. १७ : तळेघर (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे (श्रेणी १) तळेघर, गाडेवाडी, राजपूर, फलोदे, सावरली या गावांमधील जनावरांसाठी सुरू आहे. मात्र येथील निवासस्थान मोडकळीस
दवाखान्याची इमारत १०३५ स्केअर फूट जागेत ४० बाय २३ मापाची असून सुस्थितीत आहे. परंतु आले असल्याने याठिकाणी कोणी राहत नाही. याठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. स्नेहा डफळ कार्यरत आहेत. इतर दोन्हीही पदे रिक्त आहेत. त्यांची नवीनच नेमणूक याठिकाणी करण्यात आली आहे. त्यांची सेवा चांगली असल्याचे येथील पशुपालकांनी सांगितले.
दवाखान्यातील रिक्त पदे
व्रणोपचार.........१
परिचर.........१
यांची आहे गरज
- स्वच्छता गृहाची गरज
- मनुष्य बळाची गरज
- पाण्याची व्यवस्था व पाण्याची टाकी
- निवासस्थानाची सुधारणा
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या- १०१
वंध्यत्व निर्मूलन संख्या- १७७
लसीकरण
लाळ्या खुरकूत........१२१२
लंपी........९६३
इटीवी (मेंढी व शेळी)........३८३
परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
स्तनदाह
प्रोटोझोअल डिसीजेस
चयापचय आजार
वैरण बियाणे वितरण
मका, ज्वारी- ३२० किलो
सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) तळेघर येथे उपलब्ध असणारी विविध प्रकारची औषधे उदा. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण विटा इत्यादींचा लाभ घ्यावा. एफ-एम-डी, लंपी आदींचे लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे. तसेच दवाखान्यात उपलब्ध असलेल्या उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा वापरूनच माजावर आलेल्या पशुंचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. जेणेकरून संकरित गाईपासून पैदास होणाऱ्या कालवडी जास्त दूध देतील.
- डॉ स्नेहा डफळ, पशुधन विकास अधिकारी, तळेघर ता. आंबेगाव.
पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर पशुपालकांना चांगली सेवा देत आहेत. जनावरांचे लसीकरण, पशुपालकांना वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करत आहेत.
- शंकर मोहंडुळे, तळेघर ता. आंबेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

