भाऊंच्या आठवणींवर फुटले हुंदके! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाऊंच्या आठवणींवर फुटले हुंदके!
भाऊंच्या आठवणींवर फुटले हुंदके!

भाऊंच्या आठवणींवर फुटले हुंदके!

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता.२ ः मोठा विजय मिळाला असला तरी अश्विनी जगताप यांच्या घरातील वातावरण सकाळपासूनच अतिशय भावनिक होते. घराबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी असली तरी मताधिक्यावर चर्चा नाही की कोणाच्या हातात पुष्पगुच्छ, पुष्पहार नव्हता. तिथे होता केवळ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींवर हुंदका आणि हळूवारपणे शुभेच्छांचा स्वीकार!

मतमोजणी केंद्रावर सकाळपासून जगतापांचे समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते होते. अश्विनी जगताप यांच्यासह सर्व कुटुंब घरात बसूनच आढावा घेत होते. दुपारी दोननंतर मतांची आघाडी मोठी झाली. यानंतर कौल स्पष्ट झाल्यावर त्यांनी पती लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवुन मोटारीने मतमोजणी केंद्राकडे दुपारी चार वाजता गेल्या. तिथे काही वेळ कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर पिंपळे गुरव परिसरातील स्मृतीस्थळावर सायंकाळी साडेपाचला पोहोचल्या. तिथे त्यांना हुंदका फुटला. यामुळे गर्दीही भावुक झाली. अनेकांना अश्रू अनावर झाले. यानंतर पुन्हा त्या घरी पोहोचल्या. त्यावेळी घरासमोरची प्रचंड साऱ्यांची प्रतिक्षा करत होती. आवारात थांबून त्यांनी गर्दीकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. सोबत कन्या ऐश्वर्या, मुलगा आदित्य, दीर शंकर व विजय आदी कुटुंबीय होते