पुणे
सुदेश भोसले कोट
‘बिग बी’ अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे झाले आहेत. या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. देशातील सर्वात मोठे ते कलाकार आहेत. त्यांची वाटचाल सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे. त्यांच्यावर चित्रित विविध गाण्यांच्या सादरीकरणातून त्यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना देणार आहोत. त्यासाठी ‘सकाळ’ने मोठा सहभाग दर्शविला आहे. रसिकांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.
- सुदेश भोसले, प्रसिद्ध गायक