सोसायट्यांतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार
प्रभाग २८ : पिंपळे सौदागर
सोसायट्यांतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार
- विजय गायकवाड
पिंपळे सौदागर प्रभाग २८ मध्ये पारंपरिक मतदारांसोबतच नव्याने वसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्या सोसायट्यांचा कल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे या प्रभागातून निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मागील २०१७ च्या निवडणुकीमध्ये दोन भाजप व दोन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. यंदा भाजपची चार उमेदवार निवडून आणण्याची पूर्ण तयारी दिसते आहे. मात्र, इच्छुकांची संख्या वाढली आहे. नव्या हाउसिंग सोसायट्या आणि शैक्षणिक पट्टा प्रभागात आहे. नव्या निवासी वसाहतींच्या वाढीमुळे मतदारसंख्या वाढली आहे.
समाविष्ट भाग
फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन
पक्षीय स्थिती
- भाजपकडून स्मार्ट सिटी, रस्ते, पाणी आणि वाहतूक सुलभता मुद्द्यांवर भर
- शिवसेनेसमोर नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत अंतर्गत स्पर्धा
- काँग्रेससह इतर पक्षांत शांतता, मनसेचा उमेदवार नसण्याची शक्यता
दृष्टिक्षेपात...
- नव्या सोसायट्यांतील मतदारांची भूमिका निर्णायक
- मतदानाचा कल पारंपरिक पक्षांपेक्षा विकासाभिमुख उमेदवारांकडे राहण्याची शक्यता
- विकासाभिमुख विचारांना प्राधान्य
प्रचारातील संभाव्य मुद्दे
- विकासकामे, सोसायट्यांचे प्रश्न
- पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी

