काळवाडीतील महिलांचा नाशिकमध्ये अभ्यास दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळवाडीतील महिलांचा नाशिकमध्ये अभ्यास दौरा
काळवाडीतील महिलांचा नाशिकमध्ये अभ्यास दौरा

काळवाडीतील महिलांचा नाशिकमध्ये अभ्यास दौरा

sakal_logo
By

पिंपळवंडी, ता.१६ : काळवाडी (ता.जुन्नर) येथील महिला ग्रामसंघ, नवज्योत महिला शेतकरी बचत गटाच्या महिला शेतकरी सभासदांसाठी नाशिक येथील सह्याद्री फार्म येथे शेती शैक्षणिक सहल व शेती अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यात महिलांना शेतमालाची प्रतवारी, ब्रॅडिंग, पॅकिंग, मूल्यवर्धन, निर्यातक्षम विषमुक्त शेतमालासाठी १०ट्रम थेरपी, टिश्यू कल्चर तंत्रज्ञान व निर्यात नियोजन आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने मंगळवारी (ता.१४) हा उपक्रम राबविला.ही कंपनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम, विषमुक्त शेतमाल उत्पादन व विक्री व्यवस्थापन हा प्रकल्प गेली १२ वर्ष सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज व कृषी विभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवीत आहे.
कंपनीची सह्याद्री फार्मच्या एच स्केअर, एफ.पी.सी ईन्क्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चर प्रकल्पात निवड केली आहे. जुन्नर तालुक्यात केळी पिकांचं बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सदर केळी निर्यात करणे व विषमुक्त उत्पादन यासाठी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रयत्नशील आहे. वरील उपक्रमाचा भाग म्हणून सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, प्रमोदराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी एच स्केअर इन्क्युबेशन सेंटर, मंगेश भास्कर व सह्याद्री टिम यांनी कंपनी स्थापना, उद्देश यांची माहिती दिली.
यावेळी अजय बेल्हेकर, ग्रामसंघाच्या प्रमुख अलका वामन, अंजली वामन गावात शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्माण करण्याचा आत्मविश्वास उपस्थित महिलांमध्ये निर्माण झाला.
अभ्यास दौऱ्यास जुन्नर तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सुनील वामन, डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर प्रवर्तक अजय बेल्हेकर, काळवाडी सरपंच तुषार वामन,
माजी सरपंच अंजली वामन, संचालक निलम बेल्हेकर यांचे सहकार्य लाभले.


01583