पिंपळवंडीत आरोग्य शिबिरात एक हजार जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळवंडीत आरोग्य शिबिरात एक हजार जणांची तपासणी
पिंपळवंडीत आरोग्य शिबिरात एक हजार जणांची तपासणी

पिंपळवंडीत आरोग्य शिबिरात एक हजार जणांची तपासणी

sakal_logo
By

पिंपळवंडी, या.२१: येथील शिवजन्मभूमी सेवा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन मळगंगा सभागृहात करण्यात आले होते. यात १००० ग्रामस्थांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली तसेच १२१ लोकांनी रक्तदान देखील केले केले.

पिंपळवंडी येथील बाजारतळ चौकात रविवारी (ता.१९) शिवजयंती दिनी शाहीर अक्षय डांगरे यांनी पोवाडा सादर केला. शिवनेरीवरून आलेल्या शिवज्योतचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी तरुण-तरुणींनी मर्दानी खेळ सादर केले. यावेळी गावातील ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषा करून उपस्थित होते.
यावेळी शिवजन्मभूमी फाउंडेशनने आज र्यंत केलेल्या सामजिक कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर शिवरायांचा पाळणा आणि भव्य महाआरती घेण्यात आली.तसेच लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषेतील मुलांना परितोषिकांचे तसेच महिलांसाठी आयोजित केलेल्या २५ पैठणीचा भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच यापुढे देखील असेच फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यक्रम घेण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना देण्यात आले.

01592