आमदार सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पिंपळवंडी, ता. ३० : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, निमगाव सावा, बनकर फाटा, वारूळवाडी, आणे, आपटाळे, जुन्नर, ओझर, कुसूर, पारगाव (मंगरूळ), मुक्ताई मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आळेफाटा व बोरी या ठिकाणी भव्य महारक्तदान व महाआरोग्य निदान शिबिर, तसेच नेत्ररोग तपासणी आणि शस्त्रक्रिया सप्ताह आयोजित केला होता. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान केले, तसेच आरोग्य तपासणी केली.
यावेळी लहान बाळांच्या हृदयाच्या छिद्रासाठी लागणाऱ्या शस्त्रक्रिया स्वाभिमानी सेवा संस्थेच्या माध्यमातून मोफत स्वरूपात करण्याचा मानस आमदार सोनवणे यांनी केला. त्याच अनुषंगाने शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची दखल घेण्यात आली. तसेच, त्यांच्या पुढील शस्रक्रियेसाठी मोफत व्यवस्था करून देण्यात आली. रोगनिदान शिबिर आणि नेत्र रोग तपासणी शिबिराचा लाभ दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी घेतला. या शिबिरात आलेल्या गरजू रुग्णांना चष्मेवाटप, तसेच रुग्णांची पुढील मोफत शस्रक्रियेसाठीची नाव नोंदणी केली. महा रक्तदान शिबिरात ७२६ बॅग रक्त संकलित झाले. ते परिसरातील गरजू रुग्णांना उपलब्ध होणार आहे.
सदर आरोग्य निदान शिबिरास आळेफाटा हॉस्पिटल, मते हॉस्पिटल, मॅक्सकेअर हॉस्पिटल नारायणगाव, वाय. सी. एम. हॉस्पिटल जुन्नर, तसेच एच. व्ही. देसाई नेत्रालय पुणे यांच्याकडून डॉक्टरांचे सहकार्य लाभले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन स्वाभिमान सेवा संस्थेच्या माध्यमातून केले. त्यासाठी सचिन वाळुंज, मयूर पवार, कैलास वाळुंज, समीर देवकर, संगीता वाघ, विकास आंधळे पाटील, सागर लामखडे, बंडू गटकळ, नीलेश कणसे, गणेश गाडगे, राजेश गाडगे, गणेश औटी, दिनेश जाधव, संतोष चव्हाण, संतोष वाघ, शशिकांत सोनवणे, अविनाश कर्डिले, विश्वास नाना आमले, शिवाजी शेरकर, दत्ता शिंदे, सुदर्शन शिंदे, रंगनाथ आहेर, रोहन कुटे, रामदास वेठेकर, स्वप्नील मोरे, पप्पू डुकरे, संदीप कुतळ, प्रकाश गाडगे, हौशीराम शिंदे, मधुकर दाते, नारायण वाळुंज, सुरेश देवकर, विकास राक्षे, सुशील सोनवणे, संजय कासार, जयसिंग पोटे, सचिन कोकाटे, राकेश सोनवणे, गणेश गुंजाळ, अक्षय कुटे, सूर्या ॲकॅडमीचे श्रीकांत मदने व त्यांचे विद्यार्थी, शिव फाउंडेशन आणि मित्रपरिवार आणि आई मुक्ताई माता ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, शरद सोनवणे यांना त्यांच्या चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील कार्यालयात सोमवारी (ता. २९) राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी, तसेच हजारो नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कुलस्वामी संस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे म्हणाले, ‘‘आमदार सोनवणे यांचे कार्य हे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.’’
यावेळी आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘‘माझा वाढदिवस मी माझ्या मायबाप जनतेला समर्पित करतो. बिबट हल्ल्यात ७ वर्षाच्या सिद्धार्थ याचा बळी गेला म्हणून मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. माझी ही आमदारकी माझ्या मायबाप जनतेने कुठलाही मोठा नेता बरोबर नसताना देखील पुन्हा सेवा करण्याची संधी मला दिली. २०१४-१९ या कार्यकाळात तालुका पर्यटन केला, अष्टविनायक रस्ते केले, अनेक गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित रस्ते केले, कोर्टाची अद्यावत इमारत उभी केली, अजून खूप काही कारायचे आहे, ही आमदारकी फक्त आणि फक्त शिवजन्मभूमीच्या उत्कर्षासाठी पणाला लावणार आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत व श्वास असेपर्यंत मायबाप जनतेची सेवा करणार आहे. सुरक्षाकवच विमा योजनेसाठी १लाख ३५ हजार फॉर्म आले असून, सगळ्यांना १० लाखांचा मोफत विमा काढून देणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.