दुर्गंधीचा पशुवैद्यकीय दावाखान्यास विळखा

दुर्गंधीचा पशुवैद्यकीय दावाखान्यास विळखा

Published on

सिद्धार्थ कसबे : सकाळ वृत्तसेवा
पिंपळवंडी, ता.११: पिंपळवंडी येथील श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत भव्य आहे. दवाखान्याच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरात प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळत आहे. यामुळे कर्मचारी व पशुपालक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.
पिंपळवंडी गावठाणाजवळ हा दवाखाना असून त्याच्या पाठीमागील बाजूने कुकडी डावा कालवा जातो. गावचा सर्व कचरा दवाखान्याच्या मागे कालव्याच्या रस्त्याच्या बाजूला टाकला जातो. त्याची प्रचंड दुर्गंधी पसरत असते. तसेच ज्यावेळी हा कचरा जाळला जातो. त्यावेळी प्रदूषण होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण ओतारी यांनी सांगितले.
दरम्यान, दवाखान्यात रुजू असलेले सहायक पशुधन विकास अधिकारी हे ओतूर येथील दवाखान्यात पूर्ण वेळ सेवेसाठी रुजू आहेत.

पावसाळ्याच्या काळात या इमारतीच्या पुढे पाणी साचत असते अशा साचलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांना त्यांची जनावरे दवाखान्यात घेऊन जाताना त्रासाला सामोरे जावे लागते.
या दवाखान्याच्या बाजूला कर्मचारी निवास असून प्रवेशद्वाराजवळ काही नागरिक हे कचरा टाकत असतात.


यांची आहे गरज
- स्वच्छतागृहाच्या टाकीचे काम
- पाण्याची नवीन टाकी बसविणे
- दवाखान्यापर्यंत एक सिमेंटचा रस्ता आवश्‍यक
- अत्याधुनिक एक्स रे मशिन गेल्या तीन वर्षांपासून बंद
- पशू दवाखान्यात येणाऱ्यांच्या संख्येत घट


शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया
पिंपळवंडीच्या बारा वाड्यांतून याठिकाणी शेतकरी येत असतात. पण एक्स रे मशिन बंद असल्याने सध्या तालुक्यात बेल्हे याठिकाणीच एक्स रे मशिन उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना घेऊन दूर जावे लागते परिणामी त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाया जात आहे.


एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........५७१
वंध्यत्व निर्मूलन संख्या..........१४५

लसीकरण
लाळ्या खुरकत ..........२६२१
लंपी..........२२५६
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी)..........४८८
रेबीज..........२२

परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी..........२
थायलेरिया..........५

वैरण बियाणे वितरण..........मका, ज्वारी (१३१२ किलो ग्रॅम)


चारा उत्पादन क्षेत्र..........११४८ हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र..........९९७ हेक्टर

वार्षिक चारा (टनांत)
हिरवा.......८२३५६
वाळलेला.......२६८० टन

दवाखान्यातील रिक्त पदे
व्रणोपचार.......१
परिचर.......१


सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) पिंपळवंडी येथे उपलब्ध असणारी विविध प्रकारची औषधे उदा. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण विटा इत्यादींचा लाभ घ्यावा. एफ-एम-डी, लंपी आदींचे लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे. तसेच दवाखान्यात उपलब्ध असलेल्या उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा वापरूनच माजावर आलेल्या पशुंचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. जेणेकरून संकरित गाईपासून पैदास होणाऱ्या कालवडी जास्त दूध देतील.
- डॉ. अरुण ओतारी पशुधन विकास अधिकारी


02692

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com