ध्येयवेडे झाल्याशिवाय यशप्राप्ती नाही ः डॉ. लहाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येयवेडे झाल्याशिवाय यशप्राप्ती नाही ः डॉ. लहाने
ध्येयवेडे झाल्याशिवाय यशप्राप्ती नाही ः डॉ. लहाने

ध्येयवेडे झाल्याशिवाय यशप्राप्ती नाही ः डॉ. लहाने

sakal_logo
By

पारगाव मेमाणे, ता 4 : ‘इच्छाशक्ती, कठोर परिश्रमानेच नाव होते. फुले दांपत्याने त्याग दाखविला म्हणूनच १९२ वर्षानंतरही त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व अनुसरणे हेच खरे अभिवादन. ध्येयवेडे झाल्याशिवाय यशस्वी होता येत नाही,’ असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने आयोजित ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार'' वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षीयस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी म्हणाले की, परिस्थिती बदलण्याचे धैर्य सावित्रीबाई व ज्योतिराव या महामानवांना विधात्याने दिले होते. तेच धैर्य दाखवा खानवडी गावचा सर्वांगीण विकास करा. महात्मा फुले यांचे गाव म्हणून लौकिक मिळवा.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, औद्योगिक, पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान केला जातो. सह आयकर आयुक्त पुणे क्रांती खोब्रागडे, अप्पर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे, आझम कॅम्पसच्या उपप्राचार्य शबनम खान, पत्रकार अलका धुपकर व जलतरणपटू वैष्णवी जगताप यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी सरपंच स्वप्नाली होले, सुनील धिवार, माजी सरपंच चंद्रकांत फुले, वर्षा खोमणे, योगेश रासकर, महादेव टिळेकर, विठ्ठल होले, पंडित शेळके, इस्माईल सय्यद, जयवंत नेवसे, बाळकृष्ण होले, ज्ञानदेव होले, भारती धिवार, शुभांगी होले, सोनाली गिरमे, ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनाथ होले, रमेश नेवसे, किरण होले, डॉ. संदीप होले, प्रदीप होले, राजेंद्र गिरमे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. भारती राऊत यांनी सूत्रसंचालन, जयवंत होले यांनी प्रास्ताविक केले.
----------------------------