पिंपरखेड येथे बिबट मादी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरखेड येथे बिबट मादी जेरबंद
पिंपरखेड येथे बिबट मादी जेरबंद

पिंपरखेड येथे बिबट मादी जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. ६ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबे मळा परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (ता. ५) पहाटे बिबट मादी जेरबंद झाली.
बिबट्याने बुधवारी (ता. १) रात्री या परिसरात केलेल्या हल्ल्यात पूजा जालिंदर जाधव (वय २२, रा. कळंब, ता. आंबेगाव) ही महिला ठार झाली. त्यानंतर वनखात्याने गांभिर्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वनखात्याने या परिसरात पाच पिंजरे लावले. बिबट्याने महिलेवर ज्या ठिकाणी हल्ला केला, तेथून साडेतीनशे फुटांवर विकास साहेबराव बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे बिबट मादी अडकली.
परिसरातील सीसीटीव्ही बरोबरच पिंजऱ्याला लावलेल्या स्वयंचलित ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही हीच बिबट मादी कैद झाली असून, महिलेवर हल्ला करणारी बिबट मादी हीच असणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तेथील हालचालींच्या निरीक्षणावरून आणि परिसरात मिळालेल्या बिबट्याच्या पायांच्या ठसे जुळवून वनविभागाचे ठसेतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली जात असल्याचे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.