
सम्यक छाजेड यांनी उमटविला लहान वयातच स्वतःचा ठसा!
सम्यक छाजेड यांनी उमटविला
लहान वयातच स्वतःचा ठसा!
लहान वयात स्वतःचा ठसा उमटविलेले सम्यक छाजेड यांनी बारामतीकरांना वाजवी दरात दर्जेदार, नवीन फॅशन, अत्याधुनिक रंगसंगती व डिझाईन यांचा मिलाफ असलेले कपडे मिळावेत, या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सम्यक लाइफ स्टाइल, सम्यक फॅब्रिक, त्योहार कलेक्शन, सम्यक, पेहेनावा यासारख्या दालनांच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना अतिशय उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
....
बारामती शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी घराण्यामध्ये सम्यक आनंद छाजेड यांचा जन्म झाला. कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी व्यवसायाचे बाळकडू घेतले आहे. त्यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदिरमध्ये दहावीपर्यंत आणि त्यानंतर पुण्याच्या बृहन् महाराष्ट्र कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी मास्टर डिग्री मुंबईच्या एस. पी. जैन या नामांकित महाविद्यालयातून प्राप्त केली. ‘मास्टर्स इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक अतिशय नवीन व स्पेशलाईज्ड कोर्स आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील युवकांना व्यवसायाचे अत्याधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केला जातो.
कौटुंबिक पार्श्वभूमी ही व्यवसायाची असल्याने अगदी लहानपणापासूनच सम्यक यांना कापड व्यवसायाची वेगळी गोडी निर्माण झाली. वडील व आजोबा यांना ते शालेय जीवनापासूनच या व्यवसायात मदत करीत होते. त्यांनी सन २०१८पासून सक्रियपणे या व्यवसायात सहभागी होत काही प्रमाणात जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वडील आनंद छाजेड व काका अक्षय छाजेड यांच्याकडून त्यांनी व्यवसायाचे धडे घेतले.
व्यावसायिक पार्श्वभूमी असली तरी शिक्षणाची गोडी त्यांना होती. त्यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी सन २०१४ मध्ये अमेरिकेच्या नासाचा दौरा केला. विद्या प्रतिष्ठानच्या वतीने ठराविक विद्यार्थ्यांना या सहलीमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यामध्ये सम्यक यांनी ‘नासा’मध्ये जाऊन तेथील सविस्तर माहिती घेतली. तसेच, अमेरिकेला देखील अतिशय लहान वयात भेट देऊन त्यांनी तेथील व्यवासायांचीही पाहणी केली. त्यानंतर सन २०१८ मध्ये त्यांनी दुबई येथे जाऊन तेथील व्यावसायिकांशी चर्चा केली. व्यवसाय प्रभावीपणे कसा केला पाहिजे, याचे मार्गदर्शन त्यांना या दुबई दौऱ्यातून प्राप्त झाले. त्यांनी सन २०१९ मध्ये सिंगापूर, साऊथ कोरिया, जपान येथील वेगवेगळ्या इंडस्ट्रीला भेट देत तेथील नवीन तंत्रज्ञान, त्यांची कामाची पद्धत, व्यवसाय करण्याची पद्धत तसेच जग कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, याची माहिती घेतली.
ग्राहकांना अतिशय उत्तम सेवा
बारामतीकरांना वाजवी दरात दर्जेदार, नवीन फॅशन, अत्याधुनिक रंगसंगती व डिझाईन यांचा मिलाफ असलेले कपडे मिळावेत, या दृष्टिकोनातून सम्यक यांनी गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सम्यक लाइफ स्टाइल, सम्यक फॅब्रिक, त्योहार कलेक्शन, सम्यक, पेहेनावा यासारख्या दालनांच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना अतिशय उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
नामवंत ब्रँडचे कपडे उपलब्ध
आज सम्यक फॅब्रिक, सम्यक लाईफस्टाईल, त्योहार या दालनामध्ये सुटींग, शर्टिंग, एथनिक वेअर, मेन्स वेअर, ब्रॅन्डेड मेन्स वेअर यांचे सुंदर नमुने पाहायला मिळतात. ब्लॅकबेरी, यु. एस. पोलो, किलर, मुफ्ती, इंडियन टेरेन, झोडॅक यासारख्या नामवंत ब्रँडचे कपडे सम्यक छाजेड व अक्षय छाजेड यांनी बारामतीतच उपलब्ध करून दिले आहेत. वेळ, श्रम व पैसा यांची बचत व्हावी व पुण्या मुंबईला कपडे खरेदीसाठी जावे लागू नये, या दृष्टिकोनातून सम्यक यांनी वाटचाल सुरू केली असून भविष्यात बारामतीत ग्राहकांना आणखी परिपूर्ण सेवा पुरवण्याचा सम्यक यांचा प्रयत्न आहे.
स्वतःचा नवा ब्रँड
व्यवसाय करताना स्वतःचा एक नवा ब्रँड असावा, या दृष्टिकोनातून अतिशय लहान वयात सम्यक छाजेड यांनी ‘त्योहार’ नावाचा आपला एक स्वतःचा ब्रँड विकसित केला आहे. यात लग्न बस्त्यासाठी आवश्यक असलेले नवरदेवाचे कपडे एका जागी उपलब्ध होतात. नवरदेवाच्या मागणीप्रमाणे ऑर्डरनुसार हवे तसे कपडे त्यांना
मिळतात, यातही वेगळेपण म्हणजे पुण्या-मुंबईत ज्या दिवशी नवीन फॅशन येते, त्याच दिवशी त्या फॅशनचे कपडे बारामतीत बारामतीकरांना उपलब्ध होतील, या दृष्टिकोनातून सम्यक छाजेड यांचा प्रयत्न असतो.
अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख
बारामतीतील छाजेड कुटुंबातील खुशालचंद छाजेड यांचे पणतू व किशोरकुमार छाजेड यांचे नातू, तसेच, आनंद छाजेड यांचे सुपुत्र; तर अक्षय छाजेड यांचे पुतणे म्हणून सम्यक छाजेड यांची ओळख आहे. मात्र, त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश प्राप्त केले आहे. बारामतीच्या व्यावसायिक विश्वात येत्या काही दिवसात सम्यक छाजेड ग्राहकांसाठी अनेक दर्जेदार योजना सादर करणार असून, त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.