डॉ. हेमंत मगर : अस्थिरोग विषयातील नामांकित व्यक्तिमत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. हेमंत मगर : अस्थिरोग विषयातील नामांकित व्यक्तिमत्त्व
डॉ. हेमंत मगर : अस्थिरोग विषयातील नामांकित व्यक्तिमत्त्व

डॉ. हेमंत मगर : अस्थिरोग विषयातील नामांकित व्यक्तिमत्त्व

sakal_logo
By

डॉ. हेमंत मगर : अस्थिरोग विषयातील नामांकित व्यक्तिमत्त्व

बारामती शहरात अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. हेमंत मगर यांचा एक वेगळा नावलौकीक आहे. तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या डॉ. मगर यांनी बारामतीकरांच्या सेवेसाठी मगर ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट जॉइंट अँड स्पाईन क्लिनिक सुरु केलेले आहे. डॉ. मगर हे पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक, जहॉंगीर अपोलो हॉस्पिटल, ओयस्टर पर्ल हॉस्पिटल, तसेच प्रतिभा हॉस्पिटल्स प्रा. लि., सातारा येथे वैद्यकीय सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
रुग्णांना प्रभावी उपचार प्राप्त व्हावेत, या उद्देशाने डॉ. हेमंत मगर हे गेल्या तीन दशकांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. आपल्या वैद्यकीय व्यवसायासोबतच त्यांनी वेगळी सामाजिक बांधिलकी जपली असून, अनेक कँपच्या माध्यमातून मोफत तपासणी, सल्ला व उपचारही त्यांनी केलेले आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्यातही त्यांच्या नावाचा वेगळा नावलौकीक आहे. अनेक मान्यवरांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही त्यांनी नवजीवन प्राप्त करून दिले आहे.

डॉ. हेमंत मगर यांचा वैद्यकीय अनुभवाचा आढावा
• आजवर तीन हजारांहून अधिक गुडघे सांधेरोपण यशस्वी शस्त्रक्रिया
• आजवर दोन हजारांहून अधिक खांदा सांधेरोपण शस्त्रक्रिया
• आजवर साडेतीन हजारांहून अधिक इनव्हासिव्ह स्पाईन सर्जरी केल्या.
• पश्चिम महाराष्ट्रातील पहिले लॅमिनर एअरफ्लो सुविधा असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरु करण्याचा मान.
• सातारा जिल्ह्यात रिव्हर्स शोल्डर जॉइंट रिप्लेसमेंट, अँटन्यू नी रिप्लेसमेंट, पहिली बायलॅटरल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली.
• आजपर्यंत स्पाईन सर्जरी, प्लॅस्टिक सर्जरी, पेडिअँट्रीक सर्जरी, लॅप्रोस्कोपी सर्जरी, जयपूर फूटचे दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाटप कँपचे आयोजन.
• सर्वशिक्षा अभियान, महात्मा फुले जीवनदायी योजना, पोलिसांसाठी विविध योजनांमध्ये सक्रिय सहभाग.
• या शिवाय अनेक मोफत चेकअप कँपचेही आयोजन केले आहे.
• समाजोपयोगी व सेवाभावी विविध प्रकारच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग.
• डॉ. हेमंत मगर यांचे शोधनिबंध विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून त्यांना सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, थायलंड या सारख्या देशांतील नामांकित हॉस्पिटल्सही फेलोशिप प्रदान केल्या आहेत.
• त्यांच्या तीन दशकातील अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.
• अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने डॉ. हेमंत मगर यांच्या सुश्रुत हॉस्पिटलला भारतात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना भारतात उपचार घेण्यासाठी सर्वात सुरक्षित व अद्ययावत रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे.