
विश्वासराव उर्फ नाना पाटील देवकाते
कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व
विश्वासराव ऊर्फ नाना पाटील देवकाते
आपण आमच्यासाठी लय खास... आपल्या कर्तृत्वाची वेल कायम बहरलेली... जीवनाची प्रत्येक फांदी कायम मोहरलेली... आपलं व्यक्तिमत्त्व दिवसेंदिवस खुलणारं... प्रत्येक क्षणी आनंदी राहात नवीन क्षितिज शोधणारं... आपण यशाच्या शिखरावर कायम विराजमान राहो... आणि आपणास निरोगी उदंड आयुष्य मिळो... हीच आज आपल्यासाठी वाढदिवसानिमित्ताने... आई तुळजाभवानीचरणी मनःपूर्वक प्रार्थना...
- श्री. अली असगर एफ. नगरवाला, बारामती
नाना पाटील देवकाते यांचा
राजकीय व सामाजिक प्रवास :
सन १९८० : दोन वर्षे टी.सी. कॉलेज बारामती सी.आर. म्हणून कार्यरत.
सन १९८७ ते १९९० : अध्यक्ष, अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ, बारामती.
सन १९९२ पासून पुढे सलग १० वर्षे बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक.
सन १९९७ : संचालक, श्री माळेगाव सहकारी साखर कारखाना. अध्यक्ष, डिस्लरी कमिटी तथा नगरसेवक, बारामती नगरपरिषद.
सन २००२ पासून आतापर्यंत : सदस्य जिल्हा परिषद पुणे व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे.
सन २०१७ ते २०२२ : पाच वर्षाच्या कारकिर्दीत मोरगाव-वडगाव मतदारसंघात १४७ कोटींचा घसघशीत निधी.
आदर्श जिल्हा परिषद पुरस्काराने सन्मानित, समाजरत्न म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून गुणगौरव व पुरस्काराने सन्मानित.
.........
सृष्टीचक्राच्या नैसर्गिक नियमातून जन्माला येणारा प्रत्येक माणूस ईश्वराचा अंश आणि त्याचेच एक रुप असते. पण, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचे स्थान हे मात्र त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर ठरते. परमेश्वराने माणूस म्हणून जन्माला घातले, या संधीचे सोने खरेच माझ्या दिलदार दोस्ताने केले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून सातत्याने सामाजिक कार्याच्या प्रवाहात राहाणे, हे कलियुगात तसे दुर्मिळच... नीरावागजमध्ये देवकाते कुटुंब म्हणजे सर्वार्थानेच सधन कुटुंब. ‘लाथ मारेल तिथं पाणी काढणार’ या म्हणीप्रमाणे मनाला भावेल ते मिळवणारच ही कुटुंबाची पार्श्वभूमी. मात्र, या पार्श्वभूमीच्या कणभरही गर्वाचा लवलेश नसलेला माझा दिलदार दोस्त माझे दैवत म्हणजे, आदरणीय विश्वास नाना देवकाते पाटील... लय देवमाणूस... मणभर प्रेम, जिव्हाळा घेऊन जबाबदारी आणि कर्तव्याची धुरा सांभाळत असंख्य चाहत्यांच्या मनात एक आदरयुक्त दबदबा राखत विराजमान असलेले सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे नाना...
तसे नानांबद्दल सांगावे तितकेच कमी. त्यांचा राजकीय, सामाजिक जीवनाचा आत्तापर्यंतचा हसतखेळत झालेला प्रवास आणि त्यात मिळविलेले यशाचे शिखर म्हणजे आजच्या नवयुवकांसाठी निश्चितच एक आदर्श आहे. गेली पाच वर्ष आम्ही त्यांच्यासोबत अभूतपूर्व क्षण विकास कामांच्या प्रवाहात अनुभवले आहेत... जिथं आपलं स्वतःचे मतदान नाही, अशा मतदारसंघात आजवर केलेल्या लोकसेवेच्या जोरावर आणि पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या जबाबदारीवर खरे उतरत ५६५६ मताधिक्क्याने वडगाव-मोरगाव जिल्हा परिषद गटातील लोकांचा विश्वास संपादन करीत हा आमचा जिवाभावाचा नेता तिसऱ्यांदा जिल्हा परिषद सभागृहात पोहोचला व पुढे जाऊन अध्यक्षपदही भूषविले. मतदारसंघासह जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा जसा काय महापूर आणला. विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. रस्ते, समाजमंदिर, शाळा, सभामंडप, पाणी पुरवठा योजना, पथदिवे, विविध शेती उपयोगी साहित्य वाटप, पूल, बंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा कामातून नवसंजीवनी आणली.
काम करताना ना वेळेचे बंधन ना कामाचा कंटाळा. सर्वांगीण वैभव असतानाही कायम लोकसेवेसाठी चोवीस तास सक्रिय राहाणारे परखड, स्पष्ट, पारदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला त्यांना भेटण्यासाठी वशिल्याची गरज पडली नाही. कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि संपर्कात राहून त्यांच्या जोडीने पिठलं भाकरी खाऊन
तळागाळापर्यंत जनसंपर्काची नाळ घट्ट विणणे ही नानांची खासियत. कोणतेही काम सांगा.. कोणीही सांगू द्या... कोण लांबचा अन् कोण जवळचा, हे त्यांच्या ध्यानी मनीही नाही. काम होणार असेल; तर लगेच मार्गी लावणार, होणार नसेल तर घोंगडे भिजत न ठेवता स्पष्टपणे त्यातील अडचण सांगून पर्याय सुचविणे, ही त्यांची सर्वांच्याच मनाला भावणारी कला... जिकडं जाईल तिकडं स्वतःच्या कामाने स्वतःची ओळख निर्माण करून पुस्तकी ज्ञानापेक्षा संस्कार आणि संस्कृतीचा जीवनात योग्य असा ताळमेळ घालून यशस्वी झालेला नायक म्हणजे माझा नाना... खंडोबाचे दसरे रूपच... जिथं कमी तिथं आम्ही, ही कोणताही भेद न करता माणूस म्हणून अहोरात्र सामाजिक कामात झोकून दिलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना...
आज माझ्या या दिलदार दोस्ताचा वाढदिवस... नाना आपणांस निरोगी असे उदंड आयुष्य मिळो आणि समाजाची आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडो... वाढदिवसानिमित्त आपणास मनापासून आभाळभर शुभेच्छा!