दौंडमधील वन व वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील वन व वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध
दौंडमधील वन व वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध

दौंडमधील वन व वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध

sakal_logo
By

दौंडमधील वन व वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध

- कल्याणी गोडसे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड

दौंड तालुक्यात प्रादेशिक वन विभागाचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. वनक्षेत्र दौंड, वरवंड व यवत या तीन परिमंडळात विभागलेले आहे. या वनक्षेत्रात प्रामुख्याने गवताळ परिसंस्थेत आढळणारे खुरटे वृक्ष व गवत मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, चिंकारा, तरस, खोकड, कोल्हा, लांडगा, साळींदर, ससा हे प्रामुख्याने आढळतात. यातील चिंकारा जातीचे हरिण व लांडगा हे वन्य प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. वन विभाग दौंड गवताळ परिसंस्था समृध्द करण्यासाठी देशी गवत लागवड करीत आहे. तसेच, आगीपासून वनसंपत्तीचे संरक्षणासाठी आवश्यक ठिकाणी जाळरेषा काढली जाते. वनक्षेत्रात वन्यजिवांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले. यामध्ये वनविभाग व वन्यजीव प्रेमींकडून टॅंकरद्वारे पाणी सोडले जाते.
मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. काही भागात बिबटबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. दोन वर्षांमध्ये मृत पशुधन प्रकरणे एकूण १९३ एवढी घडली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या पशुधनाची तत्काळ नुकसान भरपाई दिली जाते.
वन विभागातर्फे वृक्ष लागवडीबाबत व वन्यजीव संरक्षण आदी जनजागृतीसाठी विविध सप्ताह साजरा केला जातो. जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करून पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला वनक्षेत्रात सोडले जाते. वन जमिनीची मोजणी करून वनक्षेत्रावरील अतिक्रमण निश्चित करून सदर अतिक्रमण काढून तिथे वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य दिले जाते.
तालुक्यामध्ये पिंपळगाव वन उद्यान, डाळिंब वन उद्यान दौंड शहरालगत गुप्तेश्वर वन उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. राहुल पाटील (भावसे) व दीपक पवार (सहायक वनसंरक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही काळामध्ये दौंड वनपरिक्षेत्राचे वनविकास, वन्यजीव व वनसंवर्धनामध्ये भर घालणारे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत असून, लवकरच यास मंजुरी मिळण्यास पुणे वनविभाग प्रयत्नशील आहे