
सोशल मिडीयावर वहिनीसाहेब आमदार व्हायरल
पिंपरी, ता.२ ः ‘भाऊंचा आशीर्वाद, वहिनीसाहेब आमदार’, ‘मिस यु किंग’, ‘पिंपरी चिंचवडमध्ये फक्त जगताप पॅटर्न चालतो’, ‘लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली’...अशा अनेक पोस्ट सकाळपासूनच सोशल मीडियावर सुरू होत्या. मतमोजणीत उमेदवार अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी मिळायला सुरूवात होताच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस् ग्रुप आदींवर फोटो, व्हिडिओसह मेसेज मोठ्या प्रमाणावर येवू लागले.
निवडणूक निकालाकडे जसे राजकारण्यांचे लक्ष लागले होते. तसेच सर्व उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे तशा पोस्ट फिरत राहिल्या. तिरंगी निवडणूक हळूहळू दुरंगी वळणावर पोचल्यावर क्लिपआर्टमध्ये बदल झाले. आणि मतांची मोठी निर्णायकी आघाडी मिळत गेल्यावर विजय, शुभेच्छासह पराभव आणि जबाबदार कोण? असे स्वरूप होत गेले.
- राष्ट्रवादीचा नामुष्कीजनक पराभव, शंकर जगताप ठरले किंगमेकर
- भावाच्या प्रत्येक निवडणुकीत होता खारीचा वाटा,
आता वहिनीच्या विजयासाठी उचलला सिंहाचा वाटा
- कहो दिल से भाजप फिरसे...आमदार जगतापच...
- नाना काटेंना भोवले, राहुल कलाटेंचे बंड
- विजय नसून सहानुभूती आहे
- राहुल कलाटे रिंगणात नसते, तर हा विजय राष्ट्रवादीचा असता
- नियोजनपूर्व वंचित बहुजन आघाडीचा वापर केला
- वेळ गेलेली नाही, महाविकास आघाडी जय हो
--