
एस.बी. पाटील कॉलेजमध्ये गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम
पिंपरी, ता. ४ ः एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन महाविद्यालयात दोन दिवसीय गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम झाला. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थसहायित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’च्या अंमलबजावणीवर आणि शिक्षकांसाठी चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर, उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे, पीसीसीओईचे मुख्य परीक्षा अधिकारी डॉ. सुनील ताडे यांनी बहुविद्याशाखीय पैलूंवर माहिती सांगितली. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी पारंपारिक शिक्षणातील फरकाबद्दल सांगितले. एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने, डॉ. शीतल भंडारी, डॉ. सुदीप थेपडे, डॉ. अनुराधा ठाकरे यांनी धोरण मान्यता आणि रचना विषयाबाबत माहिती सांगितली. प्राचार्य डॉ.महेंद्र सोनवणे, तन्वी गणोरकर, अभिषेक रांका, प्राची पांडे, नेहा पाठक यांनी संयोजन केले.