शास्तीकर माफीच्या लढ्यात जगताप, लांडगे यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शास्तीकर माफीच्या लढ्यात जगताप, लांडगे यांचे यश
शास्तीकर माफीच्या लढ्यात जगताप, लांडगे यांचे यश

शास्तीकर माफीच्या लढ्यात जगताप, लांडगे यांचे यश

sakal_logo
By

पिंपरी, ता.४ : दीर्घ काळ प्रलंबित असलेला शास्तीकर माफीचा अध्यादेश अखेर शुक्रवारी (ता.३) काढण्यात आला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे आणि भाजपने केलेल्या लढ्याचे हे यश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शहर वासियांवरील शास्तीचे ४६० कोटी रुपये माफ झाले, असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर सरसकट रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत केली होती. महापालिका हद्दीतील बांधकामांना शास्ती कर आकारणी सुरू करण्यात आली. तेव्हापासून भाजपने सातत्याने लढा देत होती. जनआंदोलन उभे करण्याचे काम पक्षाने केले. शास्तीकर रद्द व्हावा, यासाठी जगताप यांनी २०१४ साली आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून नागरिकांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली होती. नंतरच्या कालावधीत त्यांनी शहरवासियांची कशी सुटका होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शास्ती माफ करण्याचा दिलेला शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला आहे. केलेल्या लढ्याचे हे यश आहे.