रामचंद्र ठकोरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामचंद्र ठकोरे यांचे निधन
रामचंद्र ठकोरे यांचे निधन

रामचंद्र ठकोरे यांचे निधन

sakal_logo
By

रामचंद्र ठकोरे यांचे निधन
माले, ता. ८ : माले (ता. मुळशी) येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मारुती ठकोरे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (ता. ५) निधन झाले. त्यांनी माले सोसायटीचे संचालक व मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून काम केले. गावातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. माले येथे व्हॉलीबॉलचे सामने आयोजित करण्यात ते सक्रिय सहभाग घेत. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. आर्किटेक्ट राजेश ठकोरे व उद्योजक गणेश ठकोरे हे त्यांचे पुत्र, तर मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे हे त्यांचे मेहुणे होत.
PNE23T29344