
प्रशासक प्रतिक्रिया
लोकप्रतिनिधींशी केव्हाही संपर्क साधल्यावर कामे होत होती. आता प्रशासकीय शासन काळात तशी कामे होत नाहीत. सुट्टीच्या दिवशीही लोकप्रतिनिशीं संपर्क साधून तक्रार मांडता येत होती. आता ती सोय नाही. त्यामुळे शासनाने निवडणूक लवकर घेणे गरजेचे आहे.
- दयानंद बाबूराव कोटमाळे, भोसरी
प्रशासकीय काळात भोसरी परिसरात रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे निघाली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र स्थानिक नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची गरज भासत आहे.
- सुलक्षणा गोविंद सुपे, भोसरी
प्रशासकीय राजवटीत कामे व्यवस्थित सुरू आहेत. काही प्रलंबित कामे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास ती मार्गी लागतात. त्यासाठी जास्त पाठपुरावा करावा लागत नाही. असा माझा अनुभव आहे.
- संदीप काटे, पिंपळे सौदागर
प्रशासकीय राजवटीत सुरूवातीला चांगले निर्णय झाले, परंतु जसा वेळ पुढे जात आहे. यात कुठे ना कुठे कामात ढिसाळपणा दिसायला लागला आहे. विकास कामे होतील असे वाटले. परंतु कामे होताना दिसत नाहीत. दफनभूमी ठराव होऊन एक वर्ष झाले अजून भूसंपादन होत नाही. काळेवाडीतील १२ व १८ मीटर रस्ता प्रलंबित आहे.
- इरफान शेख, काळेवाडी