Thur, March 23, 2023

जीवनवर्धिनी विद्यालयास
जिल्हा बॅंकेकडून मदत
जीवनवर्धिनी विद्यालयास जिल्हा बॅंकेकडून मदत
Published on : 18 March 2023, 9:36 am
पुणे, ता. १८ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने पुरंदर तालुक्यातील दिवे येथील जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालयास ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यांच्या हस्ते या संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश परांजपे यांच्याकडे सूपूर्द केला.
यावेळी जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब झेंडे. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वनिता बारवकर आदी उपस्थित होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष परांजपे यांनी जिल्हा बॅंकेचे आभार मानले. भविष्यातही जिल्हा बॅंकेच्यावतीने या शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येईल, असे प्रा. दुर्गाडे यांनी यावेळी सांगितले.