हिंगणी गाडा वनक्षेत्रात लांडग्याचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने दगावल्याची परिसरात भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणी गाडा वनक्षेत्रात लांडग्याचा मृत्यू
संसर्गजन्य आजाराने दगावल्याची परिसरात भिती
हिंगणी गाडा वनक्षेत्रात लांडग्याचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने दगावल्याची परिसरात भिती

हिंगणी गाडा वनक्षेत्रात लांडग्याचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने दगावल्याची परिसरात भिती

sakal_logo
By

पाटस, ता. ८ : हिंगणी गाडा (ता. दौंड) वनक्षेत्रात एक लांडगा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लांडग्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत वन अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याच भागात मागीलवर्षी एका संसर्गजन्य आजाराने सहा लांडग्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे यंदाही त्याची सुरुवात झाली की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सध्या लांडग्यांच्या संख्येचा आलेख कमी होत असल्याचे बोलले जाते. असे असताना मागीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात दौंड तालुक्यातील हिंगणी गाडा भागात सहा लांडग्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. कॅनाइन डिस्टेंम्पर या कुत्र्यामध्ये आढणाऱ्या संसर्गजन्य विषाणुच्या आजारामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. संसर्गजन्य आजारामुळे या भागातील लांडग्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. मात्र, प्राणी गणनेवेळी पानवठ्याजवळ लावलेल्या ट्रॅप कॅमेरात लांडग्यांचे दर्शन घडल्याने वन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.

मात्र, आता यंदा नववर्षाच्या सुरुवातीलाच लांडग्यांना ग्रहण लागलेले दिसून आले. दोन दिवसांपूर्वी हिंगणी गाडा भागात एका लांडग्याचा मृतदेह आढळून आल्याने वन विभागाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत लांडग्याची पाहणी केली. या वेळी त्याच्या अंगावरचे केस गळून पडले होते. लांडग्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या बाबत संभ्रम निर्माण झाला. या बाबत

मागीलवर्षीही संसर्गजन्य आजाराने सहा लांडग्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी एक लांडगा मृतावस्थेत आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- कल्याणी गोडसे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी