गुनाटच्या माजी उपसरपंचावर बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुनाटच्या माजी उपसरपंचावर बिबट्याचा हल्ला
गुनाटच्या माजी उपसरपंचावर बिबट्याचा हल्ला

गुनाटच्या माजी उपसरपंचावर बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

गुनाट, ता. १६ : येथील (ता. शिरूर) माजी उपसरपंच रमेश गाडे यांच्यावर सोमवारी (ता. १६) पहाटे उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्या रमेश व त्यांचे बंधू योगेश गाडे यांनी प्रतिकार केल्याने त्याने धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या पंजाचा निसटता वार रमेश गाडे यांच्या चेहऱ्यावर लागल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल गणेश म्हेत्रे, वनसेवक नवनाथ गांधले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले.


शेती आणि शेतकरी यांच्यात सध्या बिबट्या व महावितरण मोठा अडथळा ठरत आहे. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्या कधी कोठून हल्ला करील याची शास्वती नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना जिवावर उदार होऊन काम करावे लागते. नशीब बलवत्तर म्हणून काल जीव वाचला. पण बिबट्याच्या हल्ल्याचा प्रश्न कायम आहे, असे शेतकरी योगेश गाडे यांनी सांगितले.

दरम्यान, विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्रपाळीत जीव धोक्यात घालून भरण्यासाठी जावे लागते. त्यात बिबट्याच्या हल्ल्याचे भयाने शेतकरी रात्रपाळीतही शेतावर जाण्यास कचरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला दिवसपाळीत वीज उपलब्ध करून द्या, अशी मागणी न्हावरे येथील महावितरणकडे केली आहे.