

पिंपरी, ता. २ : पुण्यात ‘झिका’चा संसर्ग वाढू लागल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
झिका डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार एडिस डासामार्फत होतो. झिकाची लक्षणे दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती होण्याची गरज भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. सध्या शहरात एकही झिकाचा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे घाबरून न जाता खबरदारी घ्या, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
लक्षणे
- झिकाची लक्षणे डेंगीसारखीच असतात
- ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे
- खांदे व स्नायू दुखणे, डोकेदुखी
- थकवा येणे
उपाययोजना
- डास चावल्याने आजार होत असून पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत
- बाहेर पडताना मॉस्किटो रिपलंटचा वापर करावा
- घरातील पाण्याची भांडी, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्या
- खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात
- घरातील फुलदाणी, कुंड्यांखालील भांडी यातील पाणी बदलावे
- आठवड्यातून एकदा पाणी साठविण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ करावीत
- घराचा परिसर स्वच्छ ठेवून डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी
‘‘कोणताही ताप अंगावर काढू नका. झिकावर उपचाराकरिता आवश्यक मनुष्यबळ व औषधे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. कोणतीही लक्षणे आढळल्यास लगेचच महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांना भेटावे.’’
ः- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.