Geeta Malusare
Geeta Malusaresakal

Geeta Malusare : पुण्याच्या जखमी ‘जलपरी’ची पुन्हा समुद्रावर हुकूमत!

‘गीता, हारने का नहीं!’ दंगल या चित्रपटातील अभिनेता अमीर खान यांच्या तोंडी असलेला हा डायलॉग पुण्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्याने खरा करून दाखवला आहे.

पुणे : ‘गीता, हारने का नहीं!’ दंगल या चित्रपटातील अभिनेता अमीर खान यांच्या तोंडी असलेला हा डायलॉग पुण्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्याने खरा करून दाखवला आहे.

पुण्याची जलपरी’ अशी ओळख असलेल्या गीता हिने हातावर तब्बल ९ शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पुन्हा आपले समुद्रावर राज्य असल्याचे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्ध केले आहे. मुंबईजवळील समुद्रातील २० किलोमीटरचे अंतर तिने ३ तास ४४ मिनिटांत पोहून पूर्ण केले.

वीस वर्षांची जलतरणपटू असलेल्या गीताच्या हाताला एका स्पर्धेच्या निमित्ताने वर्षभरापूर्वी विजयदुर्ग परिसरातील समुद्रात पोहताना जेली फिश चावला होता. त्यामुळे हात निकामी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखविलेल्या गीता हिचे करिअरच धोक्यात आले होते.

गीताने होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने पुन्हा सरावाला सुरुवात केली. गेले दोन महिने तिने स्वतःला पुन्हा पाण्यात झोकून दिले आहे. अखेर तिने शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी ७ वाजता गेट आॅफ इंडियाजवळील कुलाबा प्रॉंग लाइट हाउसजवळ तिने पोहायला सुरुवात केली. हाताला वेदना होत असूनही ती समुद्रात उसळत असलेल्या लाटांवर धाडसाने स्वार झाली. सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी अटल सेतूपर्यंतचे २० किलोमीटरचे अंतर तिने ३ तास ४४ मिनिटांत पोहून पार केले आणि समुद्रावरील आपली हुकूमत पुन्हा सिद्ध केली.

गीता सध्या फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. या मोहिमेसाठी तिला राष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच, स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने स्वीमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्राचे सुनील मयेकर यांनी या मोहिमेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. वडील महेश आणि आई दीपा यांच्यासह माजी नगरसेवक अविनाश जाधव, ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अनिल पवार, मंदार मते, संपन्न शेलार यांनी तिला प्रोत्साहन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com