प्रस्तावना प्रस्तावना

प्रस्तावना प्रस्तावना

प्रस्तावना

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे अत्यंत यशायोग्य वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. त्यांच्या प्राणाहूतीमुळे अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्याने मोठी प्रगती केली. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा राहिला आहे. देशाच्या भौतिक आणि सांस्कृतिक विकासातही महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आपला महाराष्ट्र देशाचा अभिमान ठरला आहे. किंबहुना महाराष्ट्र हा आपल्या देशाचा कणा ठरला आहे. त्यामुळेच सेनापती बापटांनी वर्णन केलेल्यानुसार,

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ।
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार या भारताचा ।।
अशी आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख आहे.

महाराष्ट्राचा मंगलकलश घेऊन आलेल्या स्व. यशवतंराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे गोजिरवाने स्वप्न पाहिले होते. देशाला अभिमान वाटेल, असा महाराष्ट्र त्यांना घडवायचा होता. उजनी धरणाच्या भूमीपुजनावेळी त्यांनी केलेले भाषण त्याबाबत विशेष ठरले होते. ते म्हणाले होते, ‘पांडुरंगा, मी आज तुझी चंद्रभागा अडवतोय, मला माफ कर...पण जेव्हा तिचे पाणी माझ्या बळीराजाच्या शेतशिवारात फिरेल आणि जोंधळ्याला कणीस लागेल, तेव्हा मला त्यात तू दिसशील...’ अशी विकासाची दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. यशवंतरावांपासून आज एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी योगदान दिले आहे.

गेल्या सहा दशकांपेक्षा जास्तीच्या काळात अनेकांच्या घामातून महाराष्ट्र घडला आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका गावच्या कोतवालापासून राज्याच्या सचिवापर्यंतच्या सर्व शासकीय घटकांचा आहे. त्यांच्या सेवाभावातून महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. खडोपाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करत आहेत. गावोगावी असलेल्या आरोग्य केंद्रातून परिचारिकांपासून आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्व आरोग्यसेवा करत आहेत. पोलिस दलातील सहकारी ‘आॅन ड्यूटी २४ तास’ सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करत आहे. कृषी सेवक, कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतशिवार हिरवेगार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

असे शासकीय, निमशासकीय सर्वच घटक महाराष्ट्राला प्रगतीपथावर ठेवण्यासाठी कार्यकत आहेत. शासकीय सेवेते असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थीवर मात करून आपले भविष्य घडविले आहे. त्यातून त्यांनी देशसेवेचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. त्यातून महाराष्ट्र घडत आहे. त्यांचा समाजासाठी मोठा आदर्श आहे. त्यांच्या या कार्याची ओळख ‘सेवक महाराष्ट्राचे’ या पुस्तक रुपाने करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तो इतरांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com