किस्से निवडणुकीचे

किस्से निवडणुकीचे

किस्से निवडणुकीचे
----
तेव्हढं निगेटिव्ह नका लिहू;
कार्यकर्त्यांना सांभाळावं लागतं!

मावळ लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक २००९ मध्ये झाली. भाजप-शिवसेना युतीतर्फे शिवसेनेचे गजानन बाबर आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांच्यात लढत झाली. ‘सकाळ’ने ‘एक दिवस उमेदवारासोबत’ असे सदर चालविले. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याची लोणावळ्यात सभा होती. बातमीदार उमेदवारासोबत सकाळीच निघाले. पदयात्रा झाली. सभा झाली. उमेदवार पिंपरी-चिंचवडकडे निघाले. कार्ला येथील एका हॉटेलमध्ये दुपारी जेवणासाठी थांबले. सोबत बातमीदार, एक कार्यकर्ता आणि वाहनचालक होते. हॉटेलमध्ये असताना कर्जत तालुक्यातील एक पाच जणांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आले. त्यातील एकाने उमेदवाराला ओळख करून दिली, ‘हे आमच्या गावाचे सरपंच, हे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य. परवा त्यांची माणसं (विरोधी उमेदवाराची) गावात फिरत होती. त्यांनी पैसे वाटल्याची कुणकूण आहे. अडीच हजार मतदान आहे. तुम्हीही (हाताच्या बोटांनी नोटा देण्याचे खुणावत) काही दिलं तर सर्व मतदान आपल्या बाजूने आम्ही वळवू शकतो. त्यांनी थेटच विषय मांडल्यामुळे उमेदवार थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी हळूच बातमीदाराकडे पाहात, बाहेर जाण्याबाबत खुणावले. दहा मिनिटांनी ते पाचही जण बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. खुशी होती. ती कदाचित पैसे मिळाल्याची असावी, असा तर्क करत उमेदवाराने बोलावल्याने प्रतिनिधी हॉटेलमध्ये गेले. कोणी काहीच बोलले नाही. जेवण झाल्यानंतर गाडीत बसले. गाडी पिंपरी-चिंचवडकडे निघाली. विनवणीच्या स्वरात उमेदवार हळूच म्हणाले, ‘तेव्हढं (पैशांचा विषय) निगेटिव्ह नका लिहू. हे असं कार्यकर्त्यांना सांभाळावच लागतं.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com