अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं 
आढळराव पाटील यांचे आव्हान

अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं आढळराव पाटील यांचे आव्हान

शिरूर, ता. २ : ‘‘ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही,’’ असं म्हणत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारलं.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूरमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत ६०-७० प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतंय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटील यांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, ‘पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो,’ असं आव्हान दिले. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत, ‘पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही’ असं प्रति आव्हान आढळराव पाटील यांना दिलय. आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का, याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com