सी.पी.गोयंका इंटरनॅशनलच्या विवानला जेतेपद

सी.पी.गोयंका इंटरनॅशनलच्या विवानला जेतेपद

Published on

पुणे, ता.१९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स लॉन टेनिस स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या एकेरीमध्ये वाघोलीतील सी.पी.गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या विवान मल्होत्रा याने विजेतेपद पटकाविले. तर दुहेरीमध्ये हडपसर येथील ग्रीनवुडस् स्कूलच्या पुरंजय कुतवळ - वीर गायकवाड जोडीने बाजी मारली.
डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा झाली. आंतरराष्ट्रीय पंच तेजल कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मुलांच्या एकेरी गटात विवान याने एरंडवणे येथील सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या दर्श भुरूक याला ६-२ असे हरवत विजेतेपदाचा करंडक पटकाविला. तर तृतीय क्रमांकाच्या सामन्यात हडपसरमधील ग्रीनवुड्स स्कूलच्या पुरंजय कुतवळ याने इंदिरा स्कूलच्या अर्णव सचिन याला ६-१ असे पराभूत केले.
तर दुहेरीमध्ये हडपसरच्या ग्रीनवुड्स स्कूलच्या पुरंजय कुतवळ - वीर गायकवाड जोडीने एरंडवणेमधील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रिशय तावडे - आरुष देशपांडे जोडीला ६-० असे हरविले.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात सेवासदन हायस्कूलच्या आगम शाह-दर्श भुरुक यांनी कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलच्या गौतम दात्ये-पुरुजित मारकळे यांच्यावर ६-१ असा विजय मिळविला.
१६ वर्षांखालील मुले ः एकेरी उपांत्य फेरी - विवान मल्होत्रा (सी.पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल,वाघोली) वि.वि. पुरंजय कुतवळ (ग्रीनवूड्स स्कूल, हडपसर) ६-२. दर्श भुरुक (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे) वि.वि. अर्णव सचिन (इंदिरा नॅशनल स्कूल, वाकड) ६-२.
दुहेरी मुले उपांत्य फेरी ः क्रिशय तावडे- आरुष देशपांडे (अभिनव) वि.वि. पुरुजित मारकळे- गौतम दात्ये (मिलेनियम नॅशनल) ६-०, पुरंजय कुतवळ - वीर गायकवाड (ग्रीनवुड्स) वि.वि. आगम शाह- दर्श भुरुक (सेवासदन) ६-२.

Marathi News Esakal
www.esakal.com