शरण्या, स्पृहा, सारा, रोमा उपांत्य फेरीत
पुणे, ता. २१ : सी. एम. इंटरनॅशनल स्कूलची शरण्या प्रधान, सिंबायोसिस स्कूलची स्पृहा बोरगावकर, बालेवाडीच्या भारती विद्यापीठाची सारा गांधी आणि मिलेनियम नॅशनल स्कूलची रोमा देहाडराय यांनी आगेकूच कायम ठेवत पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या एकेरी गटातील पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत शरण्या हिने मिलेनियम स्कूलच्या रिया मार्कंडे हिचा ११-५, ११-६, ११-६ ने तर स्पृहा हिने जी. जी. इंटरनॅशनल स्कूलच्या नित्या सक्सेना हिचा ११-६, ११-६, ११-७ असा पराभव केला. सारा हिने रमी झेडू हिच्यावर ११-४, ११-५, ११-९ असा आणि रोमा हिने अटीतटीच्या सामन्यात एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या आराध्या गोंबी हिच्यावर ११-७, ४-११, १३-११, १०-१२, ११-७ ने विजय मिळविला.
मुलांच्या गटातील उपउपांत्यपूर्व सामन्यांमध्ये भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिरचा पुष्कर चक्रदेव, सी. एम. इंटरनॅशनल स्कूलचा मोहिल ठाकूर, एस.पी.एम. इंग्लिश पब्लिक स्कूलचा आरव गंधे व विस्डम वर्ल्ड स्कूलचा धैर्य शाह यांनी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
अन्य निकाल
१४ वर्षांखालील एकेरी मुले : (उपउपांत्यपूर्व फेरी) : पुष्कर चक्रदेव (भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर) वि. वि. सार्थ नकाते (अभिनव विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे) ११-१, ११-९, मोहिल ठाकूर (सी. एम. इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. साद वकील (संस्कृती स्कूल, उंड्री) ११-३, ११-६, आरव गंधे (एस.पी.एम. इंग्लिश पब्लिक स्कूल) वि. वि. प्रथमेश येलवंडे (अभिनव विद्यालय, एरंडवणे) ११-९, १३-११, धैर्य शाह (विस्डम वर्ल्ड स्कूल, हडपसर) वि. वि. अर्णव सिंग (बिशप्स, उंड्री) ११-०, ११-७.

