अध्यक्षपदासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

अध्यक्षपदासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

Published on

नरेंद्र साठे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी एकप्रकारे खुले मैदान तयार झाले आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर अनेक गणित ठरणार आहेत. तरी देखील अनेकांना आपण अध्यक्ष होऊ अशी स्वप्ने पडू लागले आहेत. अनेकदा विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव असलेले हे पद यावर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ अपरिहार्य ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणजे ग्रामीण भागातील विकास निधी वाटप, प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव आणि आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांसाठी नेतृत्व तयार करणारी महत्त्वाची व्यासपीठ मानले जाते. त्यामुळे प्रशासक कालावधी काळानंतर अध्यक्ष होण्यासाठी अनेकांची इच्छा असली तरी देखील, जिल्हा परिषद गटांचे आरक्षण होणे अद्याप बाकी आहे. त्या आरक्षणानंतरच अध्यक्षपदाचे खरे चेहेरे समोर येतील. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक आणि आत्ताच्या निवडणुकीतील राजकारण पूर्णपण बदलेले आहे. त्यामुळे सर्वच पक्षात अध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी अधिक दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्ष फुटीनंतर जिल्हा परिषदेची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढवली गेली तर कोणत्या पक्षाच्या झोळीत अध्यक्षपदाची माळ पडेल त्यानुसार अध्यक्षाचा चेहरा खऱ्या अर्थाने पुढे येईल. परंतु, युती आणि आघाडीमधील नेत्यांकडून वेगवेगळी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आपली ताकद पूर्णपणे लावून अध्यक्ष मिळवण्यासाठी काही इच्छुकांकडून आडाखे बांधण्यात येत आहेत.


चौथ्यांदा मिळणार संधी
आत्तापर्यंत अनेकदा राजकीय पक्ष अध्यक्षपदाचा चेहरा समोर ठेवून जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या. गेल्या खेपेला २०१७ च्या निवडणुकीनंतर शेवटची अडीच वर्षे अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित होते. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने त्यासाठी सर्वच पात्र आहेत. आत्तापर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातून विजय कोलते, जालिंदर कामठे, त्यानंतर प्रदीप कंद यांना खुल्या प्रवर्गातून अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आता २०२५ मध्ये चौथ्यांदा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला अध्यक्ष होण्याची संधी मिळेल.


ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांना संधी?
जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण झाल्यानंतर किती ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य पुन्हा जिल्हा परिषदेत येऊ शकतात हे स्पष्ट होईल. या ज्येष्ठ माजी सदस्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळाली तर त्यांना अनुभव या एका निकषाखाली अध्यक्षपद दिले जाईल, असे अनेकांना सध्या वाटत आहे. मात्र, राजकीय परिस्थिती आणि तालुक्यांना समान न्याय या भूमिकेचाही अध्यक्षपदासाठी विचार पक्षातील वरिष्ठ नेते विचार करतात. त्यामुळे कदाचित एखादा नवखा चेहऱ्याचीही वर्णी सुद्धा अध्यक्षपदी लागू शकते.


याचाही होणार विचार...
जिल्हा परिषदेमध्ये जर पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किती प्रभावशाली ठरू शकते याचाही विचार होऊ शकतो.
पुढील निवडणुकांपूर्वी पक्षासाठी किती भक्कम पायाभूत ठरेल,
याकडेह पक्षश्रेष्ठींकडून लक्ष दिले जाऊ शकते.
ग्रामीण भागात मतदारांशी थेट संबंध ठेवणारे अध्यक्ष भविष्यातील राजकीय समीकरणे घडविण्यात निर्णायक ठरू शकतात
म्हणून असा चेहरा पुढे आणण्यासाठी पक्षांची भूमिका असणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com