शासकीय चित्रकला परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा : शिवराम हाके

शासकीय चित्रकला परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा : शिवराम हाके

Published on

निरोप - सकाळ एनआयई, टाटा मोटर्स विद्याधनम उपक्रम लोगो वापरावा. दोन शाळा फोटो आहेत आवर्जून वापरावेत

पिंपरी, ता. १८ : चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांच्या सहवासातून सराव करत असताना अधिक उच्च ग्रेड मिळावी म्हणून परीक्षांच्या नियमांची बऱ्यापैकी माहिती असल्यास सहज उच्च श्रेणी मिळवता येते असे प्रतिपादन कलाशिक्षक शिवराम हाके यांनी केले. सकाळ माध्यम समूहाचा एनआयई उपक्रम, टाटा मोटर्स विद्याधनम् पिंपरी व योजक संस्था यांचे वतीने आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व अवसरी खुर्द येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व अवसरी खुर्द येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ विद्यालय या ठिकाणी ही कार्यशाळा झाली.
यावेळी जनता विद्यामंदिर समन्वय समिती अध्यक्ष राजेश काळे, न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका मेरिफ्लोरा डिसूझा, उपमुख्याध्यापिका रेखा आवारी, कलाशिक्षक समीर मुजावर तर भैरवनाथ विद्यालय प्राचार्य डी. डी. जाधव, पर्यवेक्षक धीरज कोळेकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुख्याध्यापक चंद्रकांत नाईकडे, कला शिक्षक दिलीप चौधरी, योगिता शिंदे, सविता जाधव, वैभव गायकवाड, गौरी विसावे उपस्थित होते.

हाके यांनी यावेळी अक्षर चित्र, संकल्प चित्र, वस्तू चित्र, स्थिर चित्र व भौमितिक रचना यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच रंगसंगती, ब्रशचा योग्य वापर, चित्राची आउटलाईन, परीक्षा पूर्वतयारी यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोणतीही कला ही आपल्या आयुष्याला आनंद देत असते. शालेय जीवनात चित्रकला परीक्षा, स्पर्धा या आपल्याला उपयोगी पडतात. प्रत्येक विषयांचे बारकावे व महत्त्वपूर्ण टिप्स, कमी वेळेत अधिक काम करण्याची क्षमता कशी वाढावी यासाठी या परीक्षांचा उपयोग होत असतो. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेची तयारी करताना काळजी घेतली पाहिजे. चित्राचा विषय निवडताना आपल्याला सहज जमेल तो विषय निवडावा.’’

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव, जनता विद्या मंदिर, भागशाळा सालगाव, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, आंबेगाव वसाहत या विद्यालयातील सुमारे ४०० विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. सकाळ एनआयईचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. सागर लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण नायकोडी यांनी आभार मानले. सकाळ एनआयईच्या वतीने शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव देण्यासाठी साप्ताहिक स्वरूपात सकाळ एनआयई हा अंक दर शुक्रवारी साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com