आधी प्रेमाने मग संशयाने वेडेपिसे
पिंपरी, ता. ४ : आधी जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणा-भाका घ्यायच्या, गुलाबी सप्ने रंगवायची, प्रेमाने वेडेपिसे व्हायचे...मग दोनाचे चार हात करीत रेशमी नाते विवाहबंधनात रूपांतरित करायचे....आणि मग काही दिवसांतच त्याने तिच्याविषयी किंवा तिने तिच्याविषयी संशयाने वेडेपिसे व्हायचे...याची परिणती टोकाचा निर्णय घेत थेट खुनी हल्ल्यातच नव्हे तर हत्येत होत असल्याचे धक्कादायक प्रकार वाढत आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढत आहेत. जोडपी टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे प्राणघातक हल्ला, खून असे गुन्हे वाढत आहेत.
प्रेमसंबंधाला विरोध
दुसरीकडे आपल्या नात्यातील तरुणीच्या वैयक्तिक जीवनातही हस्तक्षेपाचे प्रकार वाढत आहेत. तिच्या प्रेमसंबंधांना फक्त विरोधच केला जात नाही तर प्राणघातक हल्ले, खुनाचे गुन्हे केले जात आहेत.
* कारणे काय ?
- मालकी हक्काची अवास्तव भावना
- तो/ती फक्त आणि फक्त माझीच अशी धारणा
- मोबाईल, सोशल मीडियावरून वाढणारा अविश्वास
- संवादाचा अभाव
- गैरसमज निर्माण करणारे वर्तन
- भावनिक अस्थिरता
- कोणताही नकार पचविता येत नाही
- कुटुंबीयांचा दबाव
- सामाजिक विरोध
----------------
उपाय
- संवाद वाढवा, गैरसमज टाळा.
- जोडीदारावर नियंत्रण नको विश्वास ठेवा
- स्वतःची ओळख आणि स्वप्ने महत्त्वाची असली तरी नाते जपण्यास प्राधान्य
- स्वत:च्या ध्येयांना आणि जिवाला महत्त्व द्या
- शंका, तणाव एकमेकांशी बोलून दूर करा
- विश्वासाची, नात्याची जपणूक करा
- राग आला तर थोडा वेळ घेऊन आधी शांत व्हा
- नात्यात गुंतागुंत निर्माण झाल्यास तज्ज्ञांची मदत घ्या
- शाळा-महाविद्यालयातच ‘हेल्दी रिलेशनशिप’बद्दल शिकवण-धडे हवेत
-----------------
प्रेमसंबंध कसे असावेत?
- परस्पर आदर आणि विश्वास
- पारदर्शकता आणि समजूतदारपणा
- नात्यात सकारात्मकता व जबाबदारी
------------------------------------
या महिन्यातील काही प्रकार
* चिंचवडमधील इंदिरानगर परिसरात चारित्र्यावर संशय घेतलेल्या पतीच्या बेदम मारहाणीत पत्नी जखमी
* नातेवाईक तरुणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून चिंचवडमध्ये तरुणाचा खून
* भोसरीतील धावडेवस्तीत प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाची हत्या
------------------
संशय हा प्रेमसंबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. विश्वास आणि संवाद नसेल तर नाते टिकत नाही. एकमेकांच्या भावनांचा आदर करणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. संशय आणि अविश्वासामुळे नाते उद््ध्वस्त होते. त्यामुळे प्रत्येक नाते विश्वास, संवाद आणि आदर बाळगला तर आयुष्याचा उत्सव बनेल.
- वंदना मांढरे, समुपदेशिका
-------------------------------
प्रेमात पडणे चुकीच नाही, पण कुणाच्याही शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी त्याच्या कृती बघा. त्याचा आपल्या आयुष्यातील सहभाग किती खरा आहे, हे तपासणे गरजेचे असते. फक्त गोड बोलणे, भेटी यावर भर असेल तर सावध राहायला हवे.
- प्रदीप सातपुते, समुपदेशक
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.