साहित्यदीप

साहित्यदीप

Published on

साहित्यदीप
‘साहित्यदीप’ दिवाळी विशेषांक २०२५ हा यंदा ‘विनोद’ हा विषय घेऊन सजला आहे. ताणतणावाच्या जीवनात हास्य हेच सर्वोत्तम औषध ठरते, आणि त्या विनोदाच्या विविध पैलूंवर मान्यवर लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. विनोदी चित्रपट, विनोदी मालिका रसिकांना खूप आवडतात. ‘चला हवा येऊ द्या’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मालिकांचा खास रसिक वर्ग आहे. मग या विनोदाची मराठी साहित्यात निर्मिती कधी झाली हे अंकाच्या माध्यमातून उलगडले आहे. सुनीताराजे पवार यांचा अभ्यासपूर्ण लेख, तसेच इतर साहित्यिकांचे दर्जेदार लेख, कथा, कविता आणि चित्रकला या सर्वांनी हा अंक अधिक देखणा झाला आहे. गीता राऊत यांचे कलात्मक मुखपृष्ठ आणि शरद तरडे यांच्या चित्र-काव्य विभागाने या अंकाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
संपादक : ज्योत्स्ना चांदगुडे, पाने : ९६ किंमत : १५०

63157

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com