काकड आरती सांगतेनिमित्त  
नऱ्ह्यातील मंदिरात रोषणाई

काकड आरती सांगतेनिमित्त नऱ्ह्यातील मंदिरात रोषणाई

Published on

भोर, ता. ६ : भोर तालुक्यातील नऱ्हे येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काकड आरती सांगता सोहळा उत्साहात साजरा झाला.
यानिमित्त बुधवारी (ता. ५) पहाटे साडेचार वाजता काकड आरतीला प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी ६ वाजता भाटघर धरणात काकडा विसर्जन व गंगा स्नान करून वीणा पूजन व पादुका स्नान झाला. त्यानंतर मंदिरात दिव्यांची रोषणाई केली. दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा झाला. त्याचा मान अंकिता अक्षय गोळे यांना देण्यात आला. त्यानंतर तुळसी विवाह पार पडला. सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान शिवाजी मोझर यांच्या सौजन्याने किर्तीताई शेटे यांची प्रवचन सेवा झाली. सायंकाळचा महाप्रसाद शशिकांत गोळे, जगन्नाथ गोळे व मोहन वीर यांनी दिली. संगीता गोळे, विद्या गोळे, अंजना गोळे, संध्या गोळे, मंगल गोळे, शोभा गोळे यांनी महिनाभर काकड आरतीचे नियोजन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com