सातबाऱ्यावरील दोष दूर करण्यात खेडची आघाडी
पुणे, ता. १० : हस्तलिखित सातबारा उताऱ्यातील दोष दूर करण्यासाठी कलम १५५ चा सर्वाधिक वापर हा खेड तालुक्यातील तहसीलदारांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी अधिकाराचा वापर करून सर्वाधिक म्हणजे चार हजार ४४० सातबाऱ्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल मुळशी, पुरंदर आणि हवेली तालुक्यांचा क्रमांक येतो. जिल्ह्यात एकूण ३७ हजार ९६८ सातबाऱ्यांवर दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
--------
सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमात कलम १५५ नुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते. या अधिकाराचा गैरवापर जिल्ह्यात सर्वाधिक झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गेल्या पाच वर्षांतील अशा नोंदींची संख्या मागविली होती. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे ३८ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात या कलमाचा वापर करून सातबारा उताऱ्यात दुरुस्तीचे काम या चार तालुक्यात सर्वाधिक झाले असल्याचे समोर आले आहे. तर अन्य आठ तालुक्यात हे प्रमाण दोन ते अडीच हजार असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या नोंदीची समितीकडून आता पडताळणी सुरू केली आहे. या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, दुरुस्तीच्या तपासणीसाठी डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीला २०२० पासून आजवरचे असे आदेश तपासणीसाठी १० मे रोजी एक महिन्याची मुदत दिली. महसूल अधिनियम कलम १५५, १८२, २२० आणि २५७ या कलमांनुसार घेण्यात आलेल्या गावनिहाय आदेशांची यादी तयार करण्यात आली. या नोंदी करताना फेरफार कशासाठी करण्यात आला, त्यात काय बदल करण्यात आला, कोणत्या अधिकाऱ्याच्या काळात हा बदल करण्यात आला याची माहिती या यादीत देण्यात आली आहे.
आढळल्या ३७ हजार ९६८ नोंदी
शासनाच्या १५५ कलमानुसार जिल्ह्यात या काळात एकूण ३७ हजार ९६८ नोंदी आढळल्या आहेत. तर २५७ कलमानुसार (फेरफारमधील दुरुस्तीसाठी पुनरिक्षण अर्ज) ५४ नोंदी आढळल्या तर १८२ कलमानुसार (आकारीपड जमिनींच्या शेतसाऱ्याची) ३ तर २२० कलमानुसार २ नोंदी आढळून आल्या आहेत.
संगणकीकरण करताना या केल्या दुरुस्त्या
* नावे चुकविणे
* क्षेत्र चुकविणे
* नवीन शर्थीचे शेरे
* कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे
* आकारीपडबाबतचे शेरे
* वारसांच्या नोंदी वैध आणि कायदेशीर नोंदी
तालुका..........दुरुस्त्यांची संख्या
आंबेगाव..........२२२९
जुन्नर..........२०७२
बारामती..........२८६३
शिरूर..........२३४९
दौंड..........२२१५
मावळ..........२४८४
पिंपरी..........२८२७
इंदापूर..........१४१३
वेल्हा..........१११७
भोर..........२४०१
खेड..........४४००
पुरंदर ..........३८७५
हवेली..........३०३१
मुळशी..........३८८३
लोणी काळभोर..........७०७
पुणे शहर..........१०२
नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम समितीकडे यासंदर्भातील अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.
- सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.