गोकवडीत शेती विकास प्रकल्पाचे हस्तांतर

गोकवडीत शेती विकास प्रकल्पाचे हस्तांतर

Published on

पुणे, ता. १४ : गोकवडी (ता.भोर) पाणी टंचाई दूर करून शाश्वत शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ‘वनराई’ संस्थेच्या सहकार्याने गावात एकात्मिक जलसंधारण व शेती विकास प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात आला. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर शेतकऱ्यांच्या हस्ते नुकताच औपचारिक हस्तांतर सोहळा पार पडला.

गोकवडीत प्रकल्पांतर्गत १५,००० घन मीटर गाळ काढून जलसाठवण क्षमतेत वाढ करण्यात आली. जुन्या जलसाठा संरचनांची दुरुस्ती तसेच नव्या संरचना उभारण्यात आल्या. भूजल पुनर्भरणासाठी समतल चर, जलशोषक चर, फॉर्म बंडिंग यांसारखी क्षेत्र उपचार कामे करण्यात आली. आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी मल्चिंग, ठिबक सिंचनयुक्त प्रात्यक्षिक प्लॉट्स उभारले गेले, तसेच बियाणे पेरणी, सेंद्रिय शेती व मृदासंवर्धन यावर भर देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना २,४०० केशर आंबा रोपे वाटप करून फळबाग शेतीला प्रोत्साहन दिले गेले.
दरम्यान, हस्तांतर सोहळा कार्यक्रमाला दि क्लिअरिंग कंपनीचे अधिकारी दीपक चांदे आणि सुनील साळुंके यासह वनराईचे अधिकारी उपस्थित होते.

गावकऱ्यांसाठी प्रशिक्षण, संवाद व माहिती-प्रसार (IEC) उपक्रम राबवून समुदाय सक्षमीकरण साधण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे गोकवडीतील बंजर जमिनी शेतीयोग्य बनल्या असून, रब्बी हंगामासह फळबाग शेतीकडे कल वाढला आहे. याशिवाय या तालुक्यातील २२ ग्रामीण शाळांमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविण्याचा संयुक्त उपक्रमही संयुक्तपणे संस्थेने हाती घेतला. शाळांना संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, आरओ पाण्याचे फिल्टर, विज्ञान साहित्य, टेबल-खुर्च्या यांसारख्या आधुनिक साधनांनी सुसज्ज करण्यात आले. यामुळे शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची वाट खुली झाली असून, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व सुरक्षित शिक्षण वातावरण उपलब्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com