एमआयटी, सीएम इंटरनॅशनल, मेयर्सची आगेकूच

एमआयटी, सीएम इंटरनॅशनल, मेयर्सची आगेकूच

Published on

पुणे, ता. २६ : कोथरुडचे एमआयटी व्हीजीएस स्कूल, बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल, लोणी काळभोर येथील मेयर्स विश्वशांती गुरुकुल आणि हडपसर येथील बिल्लाबोंग इंटरनॅशनल स्कूल या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर दमदार विजय मिळवून पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आगेकूच कायम ठेवली.
मुंढवा येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सामनावीर अर्णव मनवेलीकरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर एमआयटी स्कूलने ह्यूम मॅकेनरी मेमोरियल स्कूलचा सहा गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या संघर्षपूर्ण लढतीत सीएम इंटरनॅशनलने लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलवर आठ धावांनी विजय नोंदविला. ३० चेंडूंत नाबाद ४६ धावा काढणारा शौर्य जगताप विजयाचा शिलेदार ठरला. आतीश तोबारेच्या नाबाद ३७ धावांच्या बळावर मेयर्स विश्वशांती गुरुकुल स्कूल संघाने वारजे येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूल संघाला ४३ धावांनी हरविले. शेवटच्या लढतीत बिल्लाबोंग हायस्कूलने वाकड येथील वॉलनट स्कूलला दहा गडी राखून सहज पराभूत केले. बिल्लाबोंगच्या मल्हार मुंजेने अष्टपैलू कामगिरी बजावून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक
ह्यूम मॅकेनरी मेमोरियल : १० षटकांत २ बाद ७८ (ईशान माळी नाबाद २२, अभिज्ञान साळुंके १०, आर्यन मुरमुरे १-१४) पराभूत वि. एमआयटी व्हीजीएस स्कूल, कोथरूड : ९.४ षटकांत ४ बाद ७९ (अर्णव मनवेलीकर २१, प्रणय ढवळे नाबाद १५, ज्ञान अढावदे ३-१२). सीएम इंटरनॅशनल स्कूल : १० षटकांत ३ बाद ८६ (शौर्य जगताप नाबाद ४६, सार्थक बुलबुले १-१२, हर्षवर्धन गुसे १-९) वि. वि. लोकसेवा इंग्लिश स्कूल : १० षटकांत ७८ (श्रेयांश मुळे ३१, ओजस खुले १४, संयम टांक २-१९, सहर्ष नायक २-११, कांदर्प पारीक २-१०). एमआयटी, लोणी : १० षटकांत २ बाद ९९ (अतीश टोबरे नाबाद ३७, स्वरूप जाधव १५, आरुष अभ्यंकर १-२०, मेदांश बागुल १-२१) वि. वि. आर्यन्स : १० षटकांत ९ बाद ५९ (मेदांश बागुल १५, प्रोणित बोरवणे ४-७, दक्ष वाघमारे २-९, राजवीर शितोळे १-१०). वॉलनट : १० षटकांत ४ बाद ४९ (ऋषित तिवारी नाबाद ६, झयान नयानी २-३, मल्हार मुंजे ३-६, प्रज्ञान दुबे ३-९, योग सचाडे १-१५) पराभूत वि. बिल्लाबोंग : ३.३ षटकांत बिनबाद ५० (मल्हार मुंजे नाबाद ६, अतिक्ष आनंद नाबाद ६, अवांतर ३८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com