श्री श्री रविशंकर विद्या मंदिरचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे, ता. १ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात पहिल्या सामन्यात भूगाव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिरने हडपसरच्या छत्रभुज नरसी विद्यालयाचा दहा विकेटने पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाबाद ३८ धावा आणि दोन विकेट, अशा अष्टपैलू खेळीसाठी विष्णू मुल्या हा सामनावीर ठरला. सासवड-बोपदेव रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. छत्रभुज नरसी स्कूलने प्रथम फलंदाजी करत सिद्धांत मालपतीच्या नाबाद ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर दहा षटकांत ६८ धावा केल्या. विष्णू मुल्या, मिहीर देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. श्री श्री रविशंकर यांनी धावांचा पाठलाग सहजरीत्या केला आणि केवळ ६.३ षटकांत सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अन्य सामन्यात बंडगार्डन येथील जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूलने उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता प्रायमरी स्कूलवर सहा विकेटने मात केली. बालेवाडी येथील सी. एम. इंटरनॅशनल यांनी कोथरूडच्या एमआयटी स्कूलचा ३४ धावांनी पराभव केला. तर कोंढव्याच्या सिंहगड सिटी स्कूलने वाघोलीतील न्यू टाइम्स इंटरनॅशनलवर २९ धावांनी मात केली. अष्टपैलू खेळीसाठी अतुल्य कारखिले, शौर्य जगताप आणि कौस्तुभ डांगी हे सामनावीर ठरले. मंगळवारी (ता. २) स्पर्धेचे अन्य उपांत्य पूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत.
संक्षिप्त धावफलक
उपांत्य पूर्व सामना ः छत्रभुज नरसी विद्यालय ः १० षटकांत ६ बाद ६८ (सिद्धांत मालपती नाबाद ३६, विष्णू मुल्या २-२१, मिहीर देशपांडे २-१०, सत्यजित देशपांडे १-६, अर्जुन उर्मीकर १-५) पराभूत विरुद्ध श्री श्री रविशंकर ः ६.३ षटकांत बिनबाद ६९ (विष्णू मुल्या नाबाद ३८, आरव धासे नाबाद १०).
डॉ. अस्मिता स्कूल : १० षटकांत ३ बाद ७० (सिद्धांत चौधरी ३७, ध्रुव जाधव १-१२) पराभूत जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूल : ९.४ षटकांत ४ बाद ७१ (अतुल्य कारखिले नाबाद ४५, स्वराज चौधरी १-५, राज चौधरी १-९).
सी.एम. इंटरनॅशनल ः १० षटकांत बिनबाद ११४ (शिवराज साकोडे नाबाद ५९, शौर्य जगताप नाबाद ४६) वि. वि. एमआयटी व्हीजीएस ः १० षटकांत ६ बाद ८० (स्वयंम पाटील २९, शौर्य जगताप २-२०).
सिंहगड सिटी स्कूल ः १० षटकांत ४ बाद १०३ (कौस्तुभ डांगी ३३, अंशुल चिपडे २६, नमन पांडे १-८, वेदांत शेळके १-१४) वि.वि. न्यू टाइम्स इंटरनॅशनल ः १० षटकांत ८ बाद ७४ (तेजस बने ३१, कौस्तुभ डांगी २-११, जिनेश डांगी २-११, भार्गव जामदार २-१५)

