पॉईंटर्स
विद्यार्थ्यांनी मागितला मोबाईल नंबर
अमेरिकेत विविध ठिकाणी भेटीमध्ये विद्यार्थ्यांचा स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा दौरा ऐनवेळी ठरला. विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विभाग, परिसर दाखविण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रा. कौस्तुभ सुपेकर यांनी मदत केली. सुपेकर यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची माहिती दिली. विद्यापीठाबद्दल कुतूहल वाटलेल्या काही विद्यार्थ्यांनी, ‘आम्ही शिक्षण घेण्यासाठी नक्की विद्यापीठामध्ये येऊ, फक्त तुमचा मोबाईल क्रमांक द्या’, असे म्हटल्यानंतर प्रा. सुपेकर यांनीही ‘‘तुम्ही नक्की या... मी तुम्हाला मदत करीन,’’ म्हणत विद्यार्थ्यांना त्यांचा क्रमांक दिला.
दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना यांची झाली मदत
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील विविध नागरिकांनी स्वतःहून मदत केली. त्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनच्या अमृता कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांची सोबत केली, त्याचबरोबर संवाद साधण्यासाठी, तंत्रज्ञान समजून सांगण्यासाठी मदत केली. याशिवाय ‘नासा’मधील डॉ. मार्क सुब्बाराव, डॉ. चेतन कुलकर्णी, स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्रा. कौस्तुभ सुपेकर, गुगलच्या गिरिजा नारळीकर, अमोल गौंड यांच्यासह इतरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याचबरोबर इतर ठिकाणी भेटीसाठी मदत केली. राज्यातील आणि पुण्यातील काही नागरिकांना विद्यार्थी आल्याचे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांची भेट घेतली.
अशी झाली निवड
पहिला टप्पा
- प्रत्येक जिल्हा परिषद केंद्रशाळेनिहाय एक ऑफलाइन परीक्षा घेतली.
दुसरा टप्पा
- दुसरी ऑनलाइन परीक्षा घेतली.
तिसरा टप्पा
-निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांसाठी ‘आयुका’मध्ये बोलावले. विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन आणि शास्त्रीय माहिती दिल्यानंतर, ‘आयुका’मार्फत तोंडी परीक्षा घेतली गेली. यामध्ये ७५ विद्यार्थी निवडले. त्यातील २५ विद्यार्थी ‘नासा’ भेटीसाठी, तर ५० विद्यार्थी ‘इस्रो’ भेटी गेले होते.
प्रश्नसंच केला जाणार
‘नासा’ आणि ‘इस्रो’ला गेलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून तयार केलेली प्रश्नावली संच स्वरूपात सर्व जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये या उपक्रमासाठीचा खास प्रश्नसंच प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षी असे नियोजन असेल
- २८ फेब्रुवारीला विज्ञानदिनाच्या निमित्ताने वर्षभराचे नियोजन जाहीर होणार.
- पहिली परीक्षा जून, दुसरी जुलै आणि विद्यार्थ्यांची अंतिम निवड ऑगस्टमध्ये होईल.
- पासपोर्टसाठी, तसेच इतर कागदपत्रे दुसरी परीक्षा झाल्यानंतर मागवले जातील.
- नासा, इस्रो याबरोबरच देशातील विविध विज्ञान संस्थांना भेटीचे नियोजन.
दृष्टिक्षेपात
परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - १६,१२१
पहिली परीक्षा दिलेले विद्यार्थी - १३,६७१
दुसरी परीक्षा दिलेले विद्यार्थी - १,५४१
‘आयुका’मध्ये मुलाखत दिलेले विद्यार्थी - २३५
‘नासा’, ‘इस्रो’ला जाण्यासाठी पात्र विद्यार्थी - ७५
‘नासा’ला गेलेले विद्यार्थी - २५
‘इस्रो’ला गेलेले विद्यार्थी - ५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

