क्रिशिव, नाखेन ३०० मीटरमध्ये प्रथम

क्रिशिव, नाखेन ३०० मीटरमध्ये प्रथम

Published on

पुणे, ता.१० ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेत ३०० मीटर धावण्याच्या प्रकारात मांजरी बुद्रुक येथील कल्याणी स्कूलची मायरा यादव, वाकडच्या वॉलनट स्कूलची अनन्या पाटील, वाकड येथील युरो स्कूलचा क्रिशिव सिंग व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नाखेन कोन्याक यांनी आपापल्या वयोगटांत प्रथम क्रमांक पटकाविला.
सारसबाग येथील बाबूराव सणस मैदानावर ८ ते १०, १० ते १२ वर्षांखालील मुला- मुलींची ३०० मीटर धावण्याची स्पर्धा पार पडली. त्यात ८ ते १० वर्षांखालील मुलीच्या गटात मायरा यादव हिने (५८.४९), १० ते १२ वयोगटात अनन्या पाटील (५१.५१), ८ ते १० वर्षांखालील मुलांच्या गटात क्रिशिव सिंग (५९.००) याने, तर १० ते १२ वर्षे वयोगटात नाखेन कोन्याक (४६.९२) याने सुवर्णपदक मिळविले.


निकाल ः
मुली ः ८ ते १० वर्षे - मायरा यादव (कल्याणी, मांजरी बुद्रुक), रिशिता सावळे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे), युविका बरीक (एसएनबीपी इंटरनॅशनल, हांडेवाडी). मुली ः १० ते १२ वर्षे - अनन्या पाटील (वॉलनट, वाकड), मायरा सोमण (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), रक्षिता राठोड (मूनलाइट पब्लिक, हडपसर). मुले ः क्रिशिव सिंग (युरो, वाकड), श्रेयस बेलोटे, शिवम प्रहर (दोघेही लोकसेवा इंग्लिश मीडियम). मुले ः १० ते १२ वर्षे - नाखेन कोन्याक (लोकसेवा इंग्लिश मीडियम), निहार लाड (कॅम्प एज्युकेशन, निगडी), साई घोडे (होली स्पिरीट कॉन्व्हेंट, लोणीकंद).

Marathi News Esakal
www.esakal.com