मुलींमध्येही ‘आर्यन्स वर्ल्ड’ला अजिंक्यपद

मुलींमध्येही ‘आर्यन्स वर्ल्ड’ला अजिंक्यपद

Published on

पुणे, ता. ११ : भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या मुलांपाठोपाठ मुलींच्या संघानेही १४ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावून पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. गोखलेनगरच्या
अक्षरनंदन स्कूलने उपविजेतेपद, तर न्यू नऱ्हे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलने तृतीय स्थान मिळविले.
नेहरू स्टेडियम येथील पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. विजेतेपदासाठी झालेल्या एकतर्फी निर्णायक लढतीत आर्यन्स वर्ल्ड स्कूलने अक्षरनंदन स्कूलचा ५०-११ असा ३९ गुणांनी धुव्वा उडविला. आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या खेळाडूंनी लोनचे २ आणि सहा बोनस गुणांसह एकूण २१ गुण मिळवत विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. त्यानंतर दुसऱ्याही डावात आर्यन्स वर्ल्ड स्कूलने पुन्हा लोन चढवत ४ गुण आणि बोनसचेही ४ असे एकूण २९ गुण मिळवत दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘अक्षरनंदन’च्या संघाला पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्या डावात ३ असे एकूण ११ गुणच प्राप्त करता आले. प्रशिक्षक प्रमोद पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवनी संकपाळ, दर्शिता नांदगावकर, आरोही मेंगे, अनन्या पवार, श्रावंती सावंत आदींनी विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले.
उपविजेत्या अक्षरनंदन स्कूलचे प्रतिनिधित्व अनन्या भोसले, ईशा नातू, पूर्वा सोनावणे, श्राव्या कदम आदींनी केले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ब्लॉसम पब्लिक स्कूलने सेंट तेरेसा स्कूलवर ३०-२० असा दहा गुणांनी विजय नोंदविला. ब्लॉसम पब्लिक स्कूलने पहिल्या डावात लोनचे ४ व एक बोनस गुणासह एकूण १५ गुण आणि दुसऱ्या डावात दोन बोनससह आठ गुणांची नोंद करत ब्राँझपदकाची कमाई केली. काव्या शेळके, ईश्वरी इंगळे, नंदिनी सणस, आराध्या कस्तुरकर, तनिष्का जाधव, स्वराली इंगळे व लावण्य पनवळे यांनी ‘ब्लॉसम पब्लिक’ चे प्रतिनिधित्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com