द्रुर्मिल धांडे, दिव्यांशी बिश्त, काव्या कोल्हटकरला दुहेरी मुकूट
पुणे, ता.११ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेत खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत पदकांची लयलूट केली. घोरपडीच्या क्लारा ग्लोबल स्कूलची दिव्यांशी बिश्त, टिळक रस्ता येथील डीईएस सेकंडरी स्कूलची काव्या कोल्हटकर आणि ज्ञानप्रबोधिनीच्या द्रुर्मिल धांडे यांनी विविध प्रकारांत दुहेरी मुकूट पटकाविले.
सारसबाग येथील बाबूराव सणस मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेला खेळाडूंसोबतच पालकांमध्येही तितकाच उत्साह पाहायला मिळाला. आपल्या मुलांची खेळाप्रती आवड, मेहनत आणि प्रगती पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मैदानात प्रोत्साहनाच्या टाळ्या आणि आनंदाचा जल्लोष दिसून आला.
निकाल
३ हजार मी. धावणे ः १४ ते १६ वर्षे मुले - ऋषील कौल (ध्रुव ग्लोबल, नांदे), अब्दुल्ला दळवी (पद्मावती इंग्लिश प्रायमरी, पिसोळी), अथर्व पेठकर (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे). मुली - आर्या डोके (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी),
८०० मी. धावणे ः १४ ते १६ मुले - आदित्य तोंडे (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड),
नांगमन सालनांग (लोकसेवा ई स्कूल, पाषाण), शौर्यन शेट्टी (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी). मुली - समीक्षा भरगुडे (श्री साई, फुरसुंगी), दिव्यांशी बिश्त (क्लारा ग्लोबल, घोरपडी), सिद्धी क्षीरसागर (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी).
६०० मी. धावणे ः १२ ते १४ वर्षे मुले : युवराज ढेबे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव), सोहम पुराणिक (विखे पाटील मेमोरियल, सेनापती बापट रस्ता), दिलात्सो नागाडंग (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव). मुली -
आरवा स्वामी, अन्विता बोरडे (दोघीही एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड), आराध्या वाघमारे (सीएमएस इंग्लिश मीडियम, प्राधिकरण). ४०० मी. धावणे ः १४ ते १६ वर्षे मुली - दिव्यांशी बिश्त (क्लारा ग्लोबल, घोरपडी),
समीक्षा भरगुडे (श्री साई इंग्लिश मीडियम), श्रेया चौगुले (सेवासदन इंग्लिश मीडियम, एरंडवणे). मुले - द्रुर्मिल धांडे (ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ), हितांश मोमाया (एमआयएस इंटरनॅशनल, बालेवाडी), आदित्य तोंडे (एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड). १२ ते १४ वर्षे मुले - व्यंकटेश करंजकर, युवराज ढेबे (दोघेही सिंहगड स्प्रिंग पब्लिक, वडगाव), कुणाल चौधरी (संस्कृती, उंद्री). मुली - अनुषा फडतरे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे), आर्या स्वामी, अन्विता बोर्डे (दोघीही एमईएस बाल शिक्षण मंदिर, कोथरूड).
१०० मी. धावणे ः १२ ते १४ वर्षे - आदित्य माने (डीएसके, धायरी), समर्थ जाधव (आर्मी पब्लिक, घोरपडी),
अंकुर त्रिपाठी (इंडियन एज्युकेशन अकादमी, जा. से. त्यागी स्कूल, खडकी). ८ ते १० वर्षे मुले ः रियान चव्हाण (केंद्रीय विद्यालय, देहूरोड), अर्चित अलवाणी (डीईएस न्यू इंग्लिश मीडियम, शनिवार पेठ), आरव जगदाळे (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव). मुली - काव्या कोल्हटकर (डीईएस सेकंडरी स्कूल, टिळक रस्ता),
मयुरा यादव (कल्याणी, मांजरी), रमा पाठक (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे). १२ ते १४ वर्षे -
साक्षी हुंडेलकर (एमईएस बाल शिक्षण इंग्लिश मीडियम, कोथरूड), अनुषा फडतरे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे),
कादंबरी शेलार (कटारिया, गुलटेकडी). १४ ते १६ वर्षे - द्रुमिल धांडे (ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ),
जॉय मोमीन (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), अवधूत देशमुख (अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम, आंबेगाव). मुली - राजनंदिनी मोहिते (सिंबायोसिस, प्रभात रस्ता), आर्या धामणे (सरहद, कात्रज),
विधी लाडे (कल्याणी, मांजरी). ८० मी. धावणे ः ८ ते १० वर्षे मुली - काव्या कोल्हटकर (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता),
मायरा यादव (द कल्याणी, मांजरी), रमा पाठक (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे). मुले - अर्चित अलावनी (डीईएस सेकंडरी,
टिळक रस्ता), रियान चव्हाण (केंद्रीय विद्यालय, देहूरोड), आरव जगदाळे (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव). १० ते १२ वर्षे मुले - अझलान सय्यद (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प), सम्राट कदम (सरहद, कात्रज), नाखेन कोन्याक (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव). मुली - माही रासकर (आर्मी पब्लिक, रेसकोर्स), स्वरा चव्हाण (ब्लॉसम पब्लिक, ताथवडे),
अन्वी शेळके (एस.बी. पाटील पब्लिक, रावेत).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

