अभिनव, आर्यन्स वर्ल्डला दुहेरी विजेतेपद
पुणे, ता. ११ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेच्या ४०० मीटर रिले प्रकारात एरंडवणेच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल आणि भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलने दुहेरी विजेतेपद पटकाविले.
सारसबाग येथील सणस मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत मुलांच्या ८ ते १० वर्षे गटात ४०० मी. रिले प्रकारात एरंडवणेच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलने (कबीर गोडबोले, देवांश उंबरकर, मल्हार पोतनीस, अद्वैत जोशी) विजेतेपद पटकाविले. फुलगावचे लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलने (शिवम परहार, शिवम वागस्कर, तन्मय औटी, श्रेयश बेलोटे) रौप्यपदक प्राप्त केले.
मुलींच्या ८ ते १० वर्षे गटाच्या ४०० मीटर रिलेमध्ये एरंडवण्याच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल संघाने (अवनी वर्तक, तीर्थ नाटेकर, ह्रिषीता रावळे, रमा पाठक, इलाक्षी वरस्कर) अजिंक्यपद मिळविले. तर लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल संघाने (आरोही येलवंडे, आर्वी वागस्कर, किंजल चव्हाण, मयुरी मकाने) उपविजेतेपद मिळविले.
मुलींच्या (१० ते १२ वर्षे) ४०० मीटर रिलेमध्ये भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूल (युक्ता चव्हाण,
वीरजा देसाई, सई शहाळकर, अनुश्री खानविलकर, शुभदा पुजारी), अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे (सई पाटील,
राजेश्वरी गायकवाड, अकिरा जगदाळे, अनिका राजोपाध्ये, सान्वी धावे) आणि आर्मी पब्लिक स्कूल, रेसकोर्स यांनी (माही रासकर,आरोही गारगोटे, कीर्ती घोरपडे, सिद्धी कणसे, आयुषी सोले) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान मिळविले.
मुलांच्या १० ते १२ वर्षे गटात ४०० मीटर रिलेमध्ये आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी (कैवल्य पोतदार, अर्णव शिंदे,
शिवांशू सेलूकर, राघव यादव, श्रवण लाड), अभिनव विद्यालय, एरंडवणे (शर्व जोशी, स्वराज आंबेगावकर,
गौरव नवले, विहान केसकर, ओम कारखानीस) आणि लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, फुलगाव (नाखेन कोन्याक,
वेदांत कुसाळकर, जिग्नेश दूधमाळ, फांगलीम कांगलीम) यांच्या संघांनी अनुक्रमे पहिले ते तृतीय स्थान प्राप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

