गौरव, दिग्विजय नवले भावंडांना दुहेरी सुवर्ण
पुणे, ता.१३ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स सायकलिंग स्पर्धेमध्ये एरंडवणे येथील अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या गौरव नवले, दिग्विजय नवले या भावंडांनी सुवर्णपदकांची कमाई केली. याशिवाय, मनस्वी दारा, शर्व वाळके, सानिया शहा, श्रेया महाजन यांनीही जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी संजय साठे, अभिजीत मोहिते, स्वप्नील माने, प्रमोद कोरडे, गौरव आरसुरे, अजित येळवंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते. कर्वेनगर येथील बोगनवेल फार्मपासून पंडित फार्म आणि परत तिथून पुन्हा बोगनवेल फार्मपर्यंत असा स्पर्धेचा मार्ग राहिला.
निकाल
१२ वर्षांखालील गट ः मुले (२ किमी) - गौरव नवले (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे),
आर्यन पाटील (सी.एम. इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी), भूषण फडणीस (एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, सदाशिव पेठ).
मुली (२ किमी)- मनस्वी दारा (विबग्योर हायस्कूल, मगरपट्टा), स्पृहा रेवाडकर (अमनोरा स्कूल, हडपसर),
लिशा चौधरी (पोतदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड). १४ वर्षांखालील गट ः मुले (४ किमी) - शर्व वाळके (करेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कोरेगाव), श्रेयस खलाडकर (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे), आरुष आडगावकर (न्यू इंडिया स्कूल सेकंडरी, कोथरूड). मुली (४ किमी) - सानिया शहा - अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे,
त्रिशा कुमार (सेंट अर्नोल्ड्स सेंट्रल स्कूल, वडगाव शेरी), अनन्या गरुडकर (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव बुद्रुक).
१६ वर्षांखालील गट ः मुले (६ किमी) - दिग्विजय नवले (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे),
दर्श चुनेकर (लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन जिमखाना), तेजस रैना (एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड). मुली (६ किमी) -
श्रेया महाजन (विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल, नांदेड सिटी), तन्वी भिडे (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे),
राशी शेट्टी (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, बाणेर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

