सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगची तयारी अंतिम टप्प्यात

Published on

पिंपरी, ता. १३ ः सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आणि पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत सकाळ प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारपासून (ता.१६) स्पर्धेला सुरुवात होत असून ही स्पर्धा दिवस-रात्र रंगणार आहे. विजेत्या संघाला करंडक आणि दीड लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
पिंपरी येथील रयत शिक्षण संस्था संचालित नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या शुभारंभाची खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. निधी केटरर्स आणि ‘ऑक्सिकूल पॅकेजड् ड्रिंकिंग वॉटर’ यांचे स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे. उपविजेत्या संघाला चषक आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
तृतीय क्रमांकाच्या संघाला ७५ हजार, चषक तसेच चतुर्थ क्रमांकासाठी ५० हजार रुपये आणि चषक दिला जाणार आहे. स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध भागांतील संघही मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा टेनिस चेंडूवर खेळविली जाणार आहे.

‘टेप बॉल’ने खेळ !
खेळाचा रोमांच आणखी वाढविण्यासाठी सामन्यातील प्रत्येक तिसरे षटक हे ‘टेप बॉल’चे असेल. त्यामध्ये चेंडूवर ‘इलेक्ट्रिकल’ टेप गुंडाळण्यात येणार आहे. त्याने चेंडूला वेग आणि उसळी मिळणार असून खेळ अधिक जलद आणि रंगतदार होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा कस लागणार आहे. तर, प्रेक्षकांनाही एक नवा अनुभव या माध्यमातून मिळणार आहे.


अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन करण्यात येते. प्रभाग क्रमांक १५ मध्ये कुस्तीपटू घडविण्याच्या उद्देशाने स्वखर्चातून कुस्तीचा सुसज्ज आखाडा उभारण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कुस्तीपटूचे करिअर अर्धवट राहू नये, यासाठी फाउंडेशनच्यावतीने चार कुस्तीपटूंना दत्तक घेतले आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध क्रीडा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. आता सकाळ माध्यम समूहाने क्रीडा स्पर्धांसाठी प्रायोजकत्व स्वीकारून खेळाडू घडवण्याची संधी दिली. या योगदानाबद्दल सकाळ समूहाचे मनःपूर्वक आभार.
- अनुप मोरे, अध्यक्ष, अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाउंडेशन

टेनिस बॉल क्रिकेटची ‘क्रेझ’ जास्त असून त्याचे व्यासपीठही मोठे आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमधूनही राज्यस्तरावर गुणवान खेळाडू खेळत आहेत. टेनिस बॉलकडून लेदर बॉलकडेही खेळाडूंचा कल दिसतो. सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगमधूनही चांगले खेळाडू नक्कीच पुढे येतील.
- राहुल वेंगसरकर, क्रिकेट प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com