अर्चित, अद्वैत, ऋत्वा, अनिशाची अंतिम फेरीत धडक
पुणे, ता.१५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरी गटात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अर्चित खानदेशे, पवार पब्लिक स्कूलचा अद्वैत फेरे, द बिशप्स स्कूलचा ललितचंद्र आत्माकुरू, दिल्ली पब्लिक स्कूलची अनिशा पिंगे, अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऋत्वा पांडे आदींनी अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरी गटात सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी, प्रभात रस्ता येथील सिंबायोसिस स्कूल, कोथरुडच्या एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल आदी संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. बाणेर येथील डब्ल्यू १८ स्पोर्टस युनिव्हर्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
उपांत्य फेरीचे निकाल
दुहेरी ः १२ वर्षांखालील मुले ः अर्जुन चॅटर्जी - सिद्धांत धामा (दिल्ली पब्लिक स्कूल, कोंढवा) वि.वि. अरित भाटिया - यथार्थ तिवारी (संस्कृती स्कूल, वाघोली) ८-११, ११-५, ११-६. अर्चित खानदेशे - कबीर तांबे (ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे)वि.वि. अन्वित राजवाडे - ईशान रॉय (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) ११-४, ११-१.
१४ वर्षांखालील मुले ः आदित्य आयचीत - अव्युक्त बेंगाळे (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कोथरूड) वि.वि. ललितचंद्र आत्माकुरू - विराज सिंग (द बिशप्स स्कूल, कॅम्प) ११-८, १०-११, ११-९.
आर्यन भोसले - शौर्य खरात (सिंबायोसिस स्कूल, प्रभात रस्ता) वि.वि. अनय जोशी - रियान आठवले (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे) ११-९, ११-३. १६ वर्षांखालील मुले ः नील कुलकर्णी - ओंकार घाणेकर (ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ) वि.वि. अथर्व लाहोटी - सुमीत आणे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे) ११-२, ११-६.
दिव्यांश कौशिक - विवान सिंग (द बिशप्स स्कूल, कॅम्प) वि.वि. अनिकेत भाट - शुभंकर शेठ (डीईएस सेकंडरी स्कूल, टिळक रस्ता) ११-५, ११-१०.
एकेरी गट ः १२ वर्षांखालील मुले - अर्चित खानदेशे (ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे) वि.वि. कबीर तांबे (ध्रुव ग्लोबल, सुस)
११-४, ११-५. अद्वैत फेरे (पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी) वि.वि. संजीत दचेपल्ली (विस्तारा वर्ल्ड स्कूल, हडपसर)
११-२, ११-६. १४ वर्षांखालील मुले - ललितचंद्र आत्माकुरू (द बिशप्स स्कूल, कॅम्प) वि.वि. मीर अली (ब्लूमफिल्ड हाऊस ऑफ नॉलेज, उंड्री) ९-११, ११-४, ११-९. समीत ठोकळ (द बिशप्स को-एड, उंड्री) वि.वि. अनुज भोसले (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी) ११-२, ११-१०. १६ वर्षांखालील मुले - अवनीश बांगर (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे) वि.वि. अद्वय गंधे (सेवासदन इंग्लिश मीडिम स्कूल, एरंडवणे) ११-३, ११-५. दिव्यांश कौशिक (द बिशप्स, कॅम्प) वि.वि. आयांश यरगट्टी (हचिंग्स हायस्कूल, कॅम्प) १०-११, ११-७, ११-८.
मुली दुहेरी ः १२ वर्षांखालील गट - अन्वी जोशी - शनाया राजवाडे (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड) वि.वि. अर्चिता दामले - रुचा नवरे (एमईएस इंटरनॅशनल, बालेवाडी) ११-३, ११-५.
१४ वर्षांखालील गट ः शुभदा जाधव - तनिषा चावला (सेंट हेलेनाज स्कूल, कॅम्प) वि.वि. रितू लयकर - वरा पुंगेनवार (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक स्कूल, न्यू नऱ्हे) ११-७, ११-९. धानी झलवाडिया- जोआना शाह (पीआयसीटी मॉडेल स्कूल, महाळुंगे) वि.वि. जैता दुबे - वेदिका श्रीवास्तव (दिल्ली पब्लिक स्कूल, कोंढवा) ११-७, ११-८.
१२ वर्षांखालील गट ः अनिशा पिंगे (दिल्ली पब्लिक, कोंढवा) वि.वि. स्वरा पांडे (पोदार इंटरनॅशनल, वाघोली) ११-७, ११-४. ऋत्वा पांडे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे) वि.वि. शनाया राजवाडे (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड) ११-९, ११-९.
१४ वर्षांखालील गट ः मुद्रा मोहिते (केंद्रीय विद्यालय, कॅम्प) वि.वि. ऍलिसन जोसेफ (सेंट जुडे हायस्कूल, देहूरोड) ११-३, ११-३. शौर्यतेजा पवार (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम, बारामती) वि.वि. आदित्री चौधरी (ध्रुव ग्लोबल, नांदे)
११-९, ९-११, ११-९. १६ वर्षांखालील गट ः स्नेहा भिसे (प्रियदर्शनी स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, इंद्रायणी) वि.वि. दर्शना माळी (आदित्य इंग्लिश मीडियम, बाणेर) ११-३, ११-४. आयुषी मुंडे (संचेती इंग्लिश मीडियम, थेरगाव) वि.वि. मिहिका पाठक (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे) ११-३, ११-८.
आर्यन-रुही, अंशुल-धानीचे विजय
मिश्र दुहेरी ः १४ वर्षांखालील गट ः आर्यन भोसले - रुही बजाज (सिंबायोसिस स्कूल, प्रभात रस्ता) वि.वि. ईशान बोरकर - रुही इंगळे (सेवासदन इंग्लिश मीडियम, एरंडवणे) ११-७, ११-८. अंशुल देशमुख - धानी झलवाडिया (पीआयसीटी मॉडेल स्कूल, महाळुंगे) वि.वि. रणवीर गायकवाड - सानिका बनकर (सिंबायोसिस स्कूल, प्रभात रस्ता) ११-५, ११-५.

